पुणे काँग्रेसच्या वतीने काँग्रेस भवनात शहिद जवानांना श्रद्धांजली वाहून चिनी प्रतीकात्मक पुतळा जाळून केला निषेध.
पुणे दि.१७-पुण्यातील काँग्रेस भवन मध्ये भारत चीन सीमेवच्या गलवान घाट भागात शाहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहुन चीनी राष्ट्रादक्ष जिनपिंगचा प्रतीकात्मक पुतळा जाळुन, हातात निषेधाचे फलक व चीन विरोधी घोषणा देऊन निषेध करण्यात आला.
पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष माजी.मंत्री रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली दि.१७ जून रोजी काँग्रेस भवन येथे निदर्शन आंदोलन करण्यात आले.
यावेळी रमेशदादा बागवे यांनी चीनच्या या कृत्याचा जाहीर निषेध व्यक्त करून काँग्रेसच्या राजवटीत स्वर्गीय इंदिराजी गांधी, स्व.राजीवजी गांधी,पी.व्ही.नरसिंग राव व डॉ.मनमोहन सिंग यांनी चीनला जशासतसे उत्तर दिले होते.
त्यानंतर आता पुन्हा ४५ वर्षांनी चीनने सीमेवर चकमकीत २० जवान शहिद झाले आहेत.परंतु देशाचे पंतप्रधान मात्र या बाबत कांहीच कसे बोलत नाहीत.काँग्रेसच्या काळातील बोफोर्स तोफ व तेजस विमान हेच आज कारगिल युद्धात आणि आता भारत - चीन सीमेवर आपल्या सुरक्षिततेसाठी तैनात केले आहेत.काँग्रेसने सातत्याने देश हिताचाच विचार केलेला आहे असे सांगितले. चीनच्या या मुजोरीत भारतीय जवान शहीद झाल्याने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सडेतोड उत्तर द्यायला हवे अशी मागणी केली.

यावेळी माजी आमदार मोहन जोशी, मा.अभयजी छाजेड,मा.अविनाश बागवे,पक्षनेते अरविंद शिंदे,संजय बालगुडे,कमलताई व्यवहारे,नगरसेविका लताताई राजगुरू,अजित दरेकर,राजेंद्र शिरसाट,रविंद्र धंगेकर,सुनील शिंदे, विठ्ठल गायकवाड, सचिन आडेकर,मेहबूब नदाफ,राजू गायकवाड,रोहित अवचीते मनोज कांबळे,
आदी नेते व कांही कार्यकर्ते उपस्थित होते.