पुणे/कोंढवा बु.-
माऊली प्रतिष्ठान कोंढवा बुद्रुक, व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे शहर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक रक्तदान दिन, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धापनदिना निमित्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान दिन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वर्धापनदिन आणि कोरोनाच्या संकटामुळे रक्ताची कमतरता भासू नये म्हणून घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ११४ बटल्याचे संकलन झाले.
रक्तदानाच्या पवित्र कार्यात सहभागी होऊन रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचे माऊली प्रतिष्टान व राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर सरचिटणीस माा.संदीप बधे यांनी आभार व्यक्त केले आहे.
कोरोना संसर्गाच्या महामारीमुळे सातत्याने रूग्णांना रक्ताची गरज भासत आहे. अनेक ठिकाणच्या ब्लड बॅंकेतील ब्लड साठा कमी होत चालला आहे. त्यामुळे नागरिकांनी रक्तदान करण्यासाठी पुढे येण्याचे आव्हान महाराष्ट्र राज्यांचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरें व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी केलेले आहे.
त्या आवाहनाला प्रतिसाद देत आमदार चेतन तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१४ जून २०२० रोजी कोंडव्यात माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक तथा पुणे शहरचे सरचिटणीस संदीप नाना बधे यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यासाठी महाविद्यालयाच्या सेवा योजना विभाग व ओम ब्लड बॅंक यांचे सहकार्य लाभले.

रक्तदानाच्या वेळी प्रत्येक रक्तदात्यास सेनेटायझर व मास्क देऊन त्यांचे आभार मानण्यात आले. त्याशिवाय इतर ५००० हजार नागरिकांना आयुष मंत्रालयाने सुचविलेले शरीराची प्रतिकार शक्ती वाढविनारे रसेनीक अल्बम ३० हे होमिओपॅथिक औषध चे मोफत वाटप करण्यात आले
यावेळी पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस, माऊली प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक मा.संदीप नाना बधे,उदयसिंह मुळीक, राकेश कामठे, रोहन कामठे, स्वप्निल शेलार,भूषण बधे, विनायक बधे, अनिकेत बधे, माऊली प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्षा सौ.प्रितीताई संदीप बधे, सचिव डॉ.किरण गोरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाळासाहेब भगत, उपप्राचार्य डॉ. प्रमोद धिवार, सौ. स्वरांजली भालेराव उपस्थित होते.