पुण्यात सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर यांच्या उपस्थितीत मजूर श्रमिकांच्या विविध मागण्यांसाठी विभागीय आयुक्तांना निवेदन

१ जून हा श्रमिकांसाठी 'शोक व आक्रोश दिवस' म्हणून पाळण्यात आला असून मेधा पाटकर यांच्या उपस्थितीत श्रमिकांच्या विविध मागण्यांसाठी विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.


पुणे दि.प्रतिनिधी-
रोनाचा संसर्ग आणि लाॅकडाऊनच्या प्रसंगामुळे संपूर्ण देशात सर्वात ज्यास्त फटका बसला तो फक्त श्रमिक व मजुरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना, कामा अभावी राहणे, अवघड आणि प्रवासाचे साधनच उपलब्ध नसल्याने त्यांची गोची झाली.अनेकांनी जिवावर उदार होऊन १००० ते १५०० किलोमीटर च्या प्रवासाला सुरवात केली.यात कांहीनी जीव गमवावा लागला तर कांहीनी प्रशासनाने रस्त्यात अडवल्याने घरदार कुटूंब सोडुन छावण्यांमध्ये कसेबसे दिवस काढावे लागले. 
   अनेक शहरात भयानक परिस्थितीचा सामना करावा लागला आहे.त्याच्या निषेधार्थ जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर आणि कार्यकर्त्यांनी कोंढवा खुर्द च्या एन.आय.बी.एम.चौकात १ जून  हा दिवस श्रमिकांसाठी 'शोक व आक्रोश दिवस' म्हणून पाळन्यात आलात्यानंतर कामगारांच्या कांही मागण्या संदर्भातील निवेदन देण्यात आले.

मागण्यांचे निवेदन देवुन चर्चा करताना सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर 

नागरिकाला भोजनाचा अधिकार असून त्याला दरमहा अन्नधान्य, डाळ व तेल मिळावे.आपापल्या गावी स्थलांतरित होणाऱ्या प्रत्त्येक बेरोजगार श्रमिकाला १५ जून पर्यंत मोफत परिवहन सुविधा द्यावी. स्थलांतरीत मजुराला लोकडाऊन झाल्यापासून १७ मे पर्यंतचे पूर्ण वेतन मिळावेत.राज्य व केंद्राने सर्वोच्च न्यायालयाचे आदेशा नुसार कोरोना पिडीतांना निधी उपलब्ध करुन द्यावा. श्रम कायद्याचे पुर्णतः पालन करावे. करदाते वगळता शेतकरी, कामगारांना १०,००० रुपयांची मदत करण्यात यावी. स्थलांतर करताना मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबांना ५ लाखांची मदत मिळावी. स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीसाठी, मनरेगा योजनेची अंमलबजावणी व्हावी इत्यादी. मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्त उदय म्हैसकर व जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना देण्यात आले


यावेळी इनक्रेडिबल ग्रुपचे अध्यक्ष असलम बागवान, इब्राहिम खान, पिरयंका केकाण, युवराज, चिन्मय दामले, सुजय मोरे, आयशा फारस, सुनिती सुरे, राजु सय्यद, शकुर शेख, साहिल मण्यार, शानु पठाण,  उपस्थित होते.

Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने