कोंढव्यात डॉक्टरांना पी पी ई किट,व ईद सणात गरीबांना दूध ,ड्राइफुट वाटप

पीपी ई किटचे वाटप करताना

कोंढवा खुर्द/पुणे -

कोरोनाच्या आजारांमुळे मृत झालेल्या बेवारस  मृत व्यक्तीवर मुलनिवासी मुस्लिम मंच अंतिमसंस्कार करण्याचे काम करीत आहेत.ज्यांचे नातेवाईक पुण्यात नाहीत किंवा ते बेवारस आहेत. आशा मृत व्यक्तीवर त्या त्या नातेवाईकांचे परमिशन घेऊन त्यांच्या धर्मानुसार अंतविधी करण्याचे काम करीत आहेत. हे लक्ष्यात घेवून त्या टीमच्या जमिर मोमीन,अंजुम इनामदार, साबिर सय्यद,अलि इनामदार, आमजद शेख,साबिर तोफखाना,शेख इब्राहिम,दानिश खान,यांना लेबर युनियनचे जाकिर नदाफ, ममताज अन्सारी, अहमद खान यांच्या मार्फत  पी.पी.ई. किट माजी आमदार महादेव अण्णा बाबर यांच्या हस्ते देण्यात आले.

                  ईद सणात मोफत दुधाचे वाटप

मोफत दुधाचे वाटप करतांना छबीलभाई पटेल,नदाफ शेख


कोरोनामुळे अडचणीत असलेल्या गोरगरिबांना ईद साजरी करण्यासाठी कोंढवा खुर्द च्या शितल पेट्रोल पम्प च्या समोरील रिक्षा स्टँड जवळ उन्मत्त सोशल फौंडेशन च्या वतीने  मोफत दुध वाटप करण्यात आले.

त्याचप्रमाने पुणे एकता सोशल फाउंडेशन व साईबाबा ग्रुपच्या वतीने ईदच्या सणासाठी लागणाऱ्या ड्रायफ्रूटचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी आमदार महादेव बाबर,माजी नगरसेवक भरत चौधरी ,नूर भाई शेख, जाकिर नदाफ,अहमद खान,ममताज अन्सारी उपस्थित होते.

Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने

Featured Post