पुणे/कोंढवा दि,३१,मे-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मुंबई नंतर पुण्यात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेला आहे.कोरोनाशी लढत असताना महाराष्ट्र सरकार कोणतीही कसर पडू दिलेली नाही.परंतु येणाऱ्या काळात ऐनवेळी रक्ताचा पुरवठा कमी पडता कामा नये म्हणून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंनी जनतेला रक्तदान करन्याचे अवाहन केलेले आहे. त्यांच्या आव्हानाला सर्वत्र मोठा प्रतिसात मिळत आहे.
 |
| सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग श्री.सुनील कलगुटकर साहेब उदघाटन करताना. |
पुण्यातील कोंढवा खुर्द येथे दि.३१ मे रविवारी माजी आमदार महादेव अण्णा बाबर यांच्या संपर्क कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
रक्तदानाच्या या पवित्र शिबिराचे उद्घाटन सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणेचे मा.श्री.सुनील कलगुटकर साहेब यांच्या हस्ते झाले.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक मा.श्री.महादेव कुंभार साहेब, पोलीस उपनिरीक्षक श्री.संतोष शिंदे साहेब, हरिनामाचे अभ्यासक ह.भ.प. श्री सुनील कामठे ह.भ.प.श्री. पंढरीनाथ लोणकर, माजी आमदार श्री. महादेव अण्णा बाबर, माजी.नगरसेवक श्री.भरत अप्पा चौधरी, शिवसेना शाखा प्रमुख श्री.सचिन कापरे, आई प्रतिष्ठाणचे अध्यक्ष पै.प्रसादजी बाबर, श्री.शंकर लोणकर उपस्थित होते.