अन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले,आणि जीवात जिव आला !

                               घरात रहा,सुरक्षित रहा!

कोंढवा पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड साहेब त्यांचे कर्मचारी व सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर व इन्क्रीडाबल ग्रुप मूळे परप्रांतीय कामगारांचा घरी जाण्याचा मार्ग सुकर झाला.
छायाचित्र:-कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड साहेब कामगारांना सुरक्षितपणे रेल्वे स्टेशनवर पोहचविण्यासाठी मार्गदर्शन व पूर्तता करताना

पुणे दि,२९ मे- 
लोकडाऊन मुळे संकटात सापडलेल्या कामगारांची ऐनवेळी ट्रेन रद्द झाल्याने उधभवलेलल्या संकटामुळे.ट्रेन मध्ये बसलेल्या कामगारांची एकच तारांबळ उडाली.घरी जाण्यास अतुरलेल्या चेहर्यावर निराशेच्या छटा पसरल्या.कामाच्या ठिकाणी मुक्काम करण्यास सुरक्षा रक्षकाने नकार दिल्याने रात्र रस्त्यावर कडवी लागली.कोंढवा भागातील कामगारांची करून कहाणी.
लॉकडाऊनचा पहिला, दुसरा, तिसरा टप्पा संपला. आता चौथा टप्पा ही संपत आलेला असला तरी ही   कोरोना कांही कमी होताना दिसत नाही. तो केंव्हा जाईल हे ही सांगता येत नाही. त्यामुळे कामाभावी आणि कोरोनाच्या भीतीने भेदरलेल्या कामगारांचे आपापल्या घरी जाण्यासाठी स्थलांतर सुरू झालेले आहेत.
कामगारांच्या स्थलांतराचे सर्व निकष पूर्ण करण्यास विलंब तर होत आहेच तर दुसरीकडे रेल्वे गाड्या वेळेवर उपलब्ध होत नाहीत.त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे कागत आहे.
इथे राहवे तर खाण्या पिण्याचा,राहण्याचा प्रश्न आहेत. आणि गावी निघावे तर साधन उपलब्ध नाहीत. म्हणुन इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थितीत झालेली आसून, दुष्काळात १३ वा महिना या प्रमाणे कांही दिवसावर पावसाळा येऊन ठेपला आहे. खरे तर सरकारच्या वतीने त्यांना त्यांच्या प्रांतात पाठवण्यासाठी प्रयत्न होत असले तरी स्थलांतराच्या कारणावरून सध्या आरोप प्रतिआरोप ही सुरू आहेत.

छायाचित्र:- सुरक्षा रक्षकाने कामगारांना सोसायटीत घेण्यास नकार दिल्याने रात्र रस्त्यावर काडावी लागली

पुण्याच्या कोंढवा भागातील उंड्री येथील गोदरेज सोसायटीच्या कामावरील ७० कामगारांना घरी जाण्याची परवानगी मिळाली असल्याने या कामगारांना दि.२६ च्या रात्री रेल्वेच्या निर्धारित वेळेत पूना रेल्वे स्टेशन मध्ये सोडण्यात आले. आपल्या घरी जाणार या आनंदात असताना ट्रेन रद्द झाल्याचे सांगण्यात आल्याने त्यांचे अवसान गळून गेले. त्यांचे धाबे दणाणले. आता पुढे काय करावे समजेना.रात्र झालेली असल्याने कसेबसे आपल्या कामाच्या ठिकाणी परतले. तेथे ही त्यांच्या नशिबी दुःखच होते. सोसायटीत घेण्यास सुरक्षा रक्षकांनी नकार दिला. त्यामुळे त्यांना नाविलाजाने रात्र भर गेट च्या बाहेर उघड्या रस्त्यावर उपाशी पोटी रात्र काढावी लागली. 

दुसऱ्या दिवशी दि.२८ रोजी कामगारा मार्फत इनक्रेडिबल समाज सेवक ग्रूपला माहिती मिळाली.या ग्रुपकडून त्यांच्या जेवणाची सोय करून  दिली व  कामगारांना सोसायटीत प्रवेश मिळवून दिला. आणि  सायंकाळी दि.२८ रोजी कोंढवा पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड त्यांचे कर्मचारी पत्यक्ष त्यांना पी.एम.टी.च्या बस मध्ये बसवून रेल्वे स्थानकात सोडण्याची व्यवस्था घडवुन आणली. सर्व कामरांनी रेल्वेच्या

डब्यात बसून घेतले. निर्धारित वेळेनुसात .ट्रेन प्लेटफर्मवरून सुटली आणि त्या कामगारांच्या चेहऱ्यावर हास्य फुलुन,त्यांचा जीवात जीव आला. 


Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने