सोनिया गांधींजींच्या निर्णयाचे पुणे काँगेसने स्वागत केले असून पुण्यातील परप्रांतीयांच्या प्रवासाचा खर्च करण्याची तयारी दर्शविली आहे

छायाचित्र:-निवेदन देतांना  शहर अध्यक्ष मा.रमेशदादा बागवे (माजी गृहराज्य मंत्री), माजी राज्यमंत्री मा. बाळासाहेब शिवरकर, माजी नगरसेवक मा. राजेंद्र शिरसाट.

पुणे दि.७ मे- पुण्यात अडकलेल्या परप्रांतीय मुजुरांचा त्यांच्या गावी जाण्याचा रेल्वे तिकीटाचा खर्च पुणे काँग्रेस करणार असून संपूर्ण प्रवाशांची माहिती व लागणारी रक्कम याची माहिती पुरवावी अशी मागणी करणारे निवेदन पुणे काँगेसच्या वतीने जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे. 

लोकडाऊन मुळे अनेक परप्रांतीयांच्या राहण्याचा, खाण्याचा, व कामा धंद्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे.कांही अटीच्या पूर्ततेनंतर त्यांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी सोय शासन करणार असल्याचे जाहीर केले आहे. परंतु देशात लोकडाऊन लागल्यापासून हाताला काम नाहीत,राहण्याचा ठाव-ठिकाना राहिलेला नाही.

आशा वेळी त्यांच्या प्रवास खर्च कोण करणार असा प्रश्न शासनापुढे निर्माण झाला त्यावेळी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी यांनी संपूर्ण देशात अडकलेल्या परप्रांतीयांचा प्रवास खर्च कांग्रेस पक्ष उचलेल असे जाहीर करून संपूर्ण परप्रांतीयांना दिलासा देणारे पाऊलं उचलले आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.बाळासाहेब थोरात यांच्या मार्ग दर्शनातुन आमदार विश्वजीत कदम यांच्या आर्थिक मदतीमुळे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर,माजी राज्यमंत्री रमेशजी बागवे, यांनी पुणे जिल्हाधिकारी  व विभागीय आयुक्त यांना पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात मजुरांची व कामगार प्रवाशांची संख्या व तिकिटाचे मूल्य याची व पुण्यातुन कोणती रेल्वे जाणार आहे  यांची माहिती देण्याची विनंती केली आहे..

Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने