६ मे १९२२ आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी शाहू महाराजांचा स्मृतिदिन आहे. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त कोटि कोटि प्रणाम.
पुणे दि.६ :- राजर्षी शाहू महाराज या लोककल्याणकारी राजाचा आज ६ मे २०२० स्मृतिदिन असून त्यांना देशभरातून त्यांना विनम्रता पूर्वक अभिवादन केले जात आहे.
शाहूं महाराजांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक लोककल्याणकारी योजना राबविल्या. मागासलेल्या समाजाला इतर समाजाच्या बरोबरीने येण्यासाठी राज्यात आरक्षणाचा लाभ मिळवुन दिला. शेती सुधारणेचे अनेक उपक्रम राबविले. शेतीला महत्व दिले. जातीयता नष्ट करण्यासाठी मागासवर्गीय व्यक्तिला हॉटेल लावुन दिले. स्वतः चहा घेण्यासाठीच नव्हे तर जातीयता नष्ट करण्यासाठी मंत्रीगणासह उपस्थीत राहणारा लोककल्याणकारी राजा होता. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.आंबेडकरांना शिष्यवृत्ती देऊन शिक्षणाची संधी देणारा राजा नव्हेत तर तो भारताचा भाग्यविधाता ठरला.
त्यांनी त्या काळात शेती विकासाला चालना दिली. पाण्याचे महत्व ओळखून त्यांनी राज्यात पाणी आडवा पाणी जमीनित मुरवा ही संकल्पना अमलात आणली. पाण्याचे महत्व त्या काळी समजले होते. आत्ताचे शेततळे, रोजगार हमी योजना ही त्याचीच फळे आहेत. असा हा दूरदर्शी जाणता राजा होता.

राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या राज्यात केलेले कल्याणकारी निवडक पण महत्वपुर्ण कायदे

➡ महारांवर कामाची सक्ती न करण्याचा व त्यांच्या जमिनी त्यांच्या नावावर शाहूंचा जाहीरनामा.
➡ अस्पृश्यांची गुलामगिरी नष्ट करणारा व त्यांना मानवी स्वातंत्र्याचे हक्क देणारा जाहीरनामा.
➡ गुन्हेगार जातीच्या लोकांची हजेरी पध्दत बंद करावी म्हणून राजाज्ञा.
➡ राज्यातील सरकारी व सर्वसाधारण खात्यात अस्पृश्यांना अग्रक्रम देण्यासाठी आदेश.
➡ प्राथमिक,माध्यमिक शाळा व महाविद्यालयातील अस्पृश्य मुलांना स्पृश्य मुलांसारखीच समानतेची वागणूक द्यावी, म्हणून शिक्षण खात्याला राजाज्ञा.
➡ अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा बंद.सरकारी शाळांमध्ये सर्व जाती- धर्माच्या मुलांना प्रवेश. शाळांतील स्पर्शास्पर्श प्रथा बंदीची राजाज्ञा.
➡ मागालेल्या वर्गातील मुलींना व स्त्रीयांना मोफत शिक्षण व खर्चाची सोय .
➡ स्रीयांचा छळ व घटस्फोट याविषयी स्त्रीयांना संरक्षण देणारा कायदा .
➡महारांना गुलामगिरीतून पूर्णपणे मुक्त केल्याची राजाज्ञा
➡ मागासलेल्या जातीच्या विद्यार्थ्यांना फी माफ.
➡ विधवा पुनर्विवाह कायदा ' व 'विवाहनोंदणी कायदा ' यांची अंमलबजावणी.