सिध्दार्थ गौतम बुध्द यांच्या २५६४ व्या जयंती तथा वैशाखी (बुध्द) पौर्णिमेच्या सर्वांना मंगलमय सदिच्छा .

 .

पुणे दि.०७ मे :-  अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे, दया, क्षमा, शांतीची शिकवण देणारे महाकारूणी तथागत सिध्दार्थ गौतम बुध्द यांच्या २५६४ व्या जयंती निमित्त अर्थात वैशाखी (बुध्द) पौर्णिमेच्या सर्वांना मंगलमय सदिच्छा.शाक्यमुनी भगवान तथागत सम्यक संबुद्धाच्या जीवनात वैशाख पौर्णिमा (वेसाक्को) चे अनन्य साधारण असे महत्व आहे.वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी तथागतांच्या जीवना संदर्भात पाच अति महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत.

१-पहिली घटना म्हणजे "राजपुत्र सिद्धार्थ गौतम बुद्धाचा जन्म वैशाखी पोर्णिमेला झाला.

२- दुसरी घटना म्हणजे युवराज्ञी माता यशोधारेचा जन्म वैशाखी पोर्णिमेला झाला.

३-तिसरी घटना म्हणजे राजकुमार सिद्धार्थाचा विवाह हा याच दिवशी वैशाखी पोर्णिमेला झाला.

४-चौथी घटना म्हणजे सिद्धार्थ गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्ती ही याच वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी झाली.

५- पाचवी घटना म्हणजे शेवटी महाकारूनिक तथागत गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण सुध्दा वैशाखी पौर्णिमेला झाले.

        अशा या दुर्मिळ योगायोगाच्या आणि अतिमहत्वाच्या घटना बौध्दधम्म संस्थापक तथागत भगवान बुद्धाच्या जीवनात घडलेल्या आहेत.त्यांचा जन्म राज घराण्यात झालेला असला तरी ते समतावादी अहिंसक वृत्तीच्या विचार सरणीचे होते. राज्या-राज्यातील सीमावर्ती तलावाच्या पाण्याच्या तंट्या वरून झालेला वाद विकोपला गेला असता संघर्ष ऐवजी राज्यत्याग करण्याची तयारी दर्शवली.

    शिकार करणे हा राजधर्म असला तरी जीव घेणाऱ्या पेक्षा,जीव वाचविणारा जीवाला जीवदान देणारा,महत्वाचा असतो हे त्यांनी धनुष्य बाणाने घायाळ राजहंसचा जिव वाचवून जगाला दाखवून पटवून दिले. प्राणिमात्रावर दया करण्याची शिकवण दिली.मानवाचे जीवन दुःखमय असल्याने त्याच्या निवारणार्थ सुखाच्या शोधत त्यांनी राज त्याग करून वनात प्रस्थान केले. अखंड तपश्या करून ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर त्यांनी पाच भिक्षुकाना ज्ञानाची दिक्षा दिली.धम्म दिला आणि पाच भिक्षुकांनी या ज्ञानाचा देश विदेशात प्रसार आणि प्रचार केला.

        जातीभेद,कर्मकांड,मोक्ष,अंधश्रद्धाच्या कचाट्यात अडकलेल्या विषमताने बरबटलेल्या मानवाला त्यांनी नवी दिशा दिली, नवे जीवन दिले.महाभयंकर डाकू असलेल्या अंगुली मामाला ज्ञानाच्या जोरावर जिकले.त्याला त्याच्या भरकटलेल्या जीवनाला सदमार्गावर आणले.

         दया, क्षमा,शांती,प्रज्ञा,शील,करुणा ची शिकवण दिली.जगाला युद्धाने नव्हे तर बुद्धाच्या शांतीने जिंकता येते ही शिकवण दिली.बुद्धधम जगभरात पसरविला जगातील अनेकांनी हा धर्माचा स्वइच्छेने स्वीकार केला.आज ही भरत भूमीला बुद्ध भूमी म्हणून ओळखले जाते.जगात अनेक देशात बुद्धाच्या शांतीचा,करुणेचा, प्रभाव आहे.अनेक बुद्ध राष्ट्र आहेत.

वैशाख पोर्णिमा हा आशिया व युरोपमधील कांही देशात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

       तथागत गौतम बुद्धाच्या जीवनातील घटनाक्रम पाहता त्यांचा जन्म भारताचा पूर्वीचा प्रांत असलेला आणि आताचा नेपाळ देशातील लुम्बिनीच्या वनात सिद्धार्थ गौतम बुद्धांचा जन्म झालेला आहे. तर बिहार राज्यसतील  बोधगया येथे त्यांना ज्ञान प्राप्त झाली अर्थात ते बुद्ध झाले आणि कुशीनगर येथे बुद्धाचे महापरिनिर्वाण झाले आहे. त्यांच्या जीवनातील त्यांचा जन्म, त्यांना झालेली ज्ञाणप्राप्ती आणि त्यांचे महापरिनिर्वाण तिन्ही घटना या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी घडलेल्या आहेत.

           वैशाख पोर्णिमा हा सण आशिया आणि युरोपमधील कांही देशात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.गौतम बुद्धाच्या जीवनातील घटनाक्रम पाहता त्यांचा जन्म भारताचा पूर्वीचा प्रांत असलेला आणि आताचा नेपाळ देशातील  लुम्बिनीच्या वनात सिद्धार्थ गौतम बुद्धांचा जन्म झालेला आहे. तर बिहार राज्यसतील  बोधगया येथे त्यांना ज्ञान प्राप्त झाली अर्थात ते बुद्ध झाले आणि कुशीनगर येथे बुद्धाचे महापरिनिर्वाण झाले आहे. त्यांच्या जीवनातील त्यांचा जन्म, त्यांना झालेली ज्ञाणप्राप्ती आणि त्यांचे महापरिनिर्वाण तिन्ही घटना या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी घडलेल्या आहेत.

   गौतम बुध्दांचा संक्षिप्त जीवनपट ...

 1) पंणजोबाचे नाव           :  राजा जयसेन
 2) पणजीचे नाव              :  राणी जयंती
 3) आजोबाचे नाव            :  राजा सिंहानू
 4) आजीचे नाव               :  राणी कच्चायना
 5) वडिलांचे नाव              :  राजा शुध्दोधन
 6) आईचे नाव                 :  राणी महामाया
 7) मावशी ( सावत्र आई)     :  महाप्रजापती गौतमी
 8) आत्या                       :  अमिता, प्रमिता
 9) आत्या भाऊ                :  देवदत्त
10) सावत्र भाऊ                :  नंद, रूपनंद
11) चुलते                        : धौतोधन, शुक्लोधन, अभितोधन
12) गौतमांचे जन्मस्थळ       :  लुंबिनी  ( नेपाळ )
13) गौतमांचे जन्मवर्ष         : इ.स.पुर्व 563 (आषाढ पौर्णिमा)
14) वंश                          : शाक्य
15) पत्निचे नाव                :  यशोधरा ( गोपा )
16) यशोधराशी लग्न           :  ई.स.पूर्व  574
17) शाक्य संघाचे सभासद    :  वयाच्या 26 व्या वर्षी
18) मुलाचे नाव                 :  राहूल
19) गौतमांचा गृहत्याग         :  29 व्या वर्षी
20) सम्यक सम्बुध्द             :  ई.स.पूर्व  528
21) महापरिनिर्वाण              :  ई.स.पूर्व  483
Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने