वंदेमातरम् प्रतिष्ठानचा गोरगरीब, साफसफाई कामगारांना मदतीचा हात.

संस्थापक/अध्यक्ष-श्री वसंतराव (मामा) चौगुले यांचा पुढाकार 

पुणे दि.४ मे- कोंढवा बुधृख येथील वंदे मातरम् संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष वसंतराव चौगुले यांनी या भागात फुल नाही फुलाची पाकळी म्हणून किराणामाल राशन किटचे वाटप  केले आहे.

     कोरोनाच्या भीतीमुळे नागरिकांना घराच्या बाहेर पडणे म्हणजे मृत्यूला अमंत्रण देण्यासारखी सध्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे.सर्व व्यवहार,कामधंदे बंद पडलेले आहेत.दैनंदिन मोलमजुरीवर पोट भरणारे अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे.

        आशा वेळी वंदे मातरमने केलेल्या या मदतीमुळे हाताचे काम गेलेल्या कुटुंबाना याची मोठी मदत झालेली आहे. ही मदत खुप मोलाची ठरलेली आहे आशा प्रतिक्रिया यावेळी बोलुन दाखवल्या गेल्या.

      यावेळी संस्थापक्/अध्यक्ष-श्री वसंतराव (मामा) चौगुले ,कार्याध्यक्ष विकास कांबळे, उधोजक तानाजी डिंबळे,व दिपक ओसवाल तसेच युवा नेते आकाश चौगुले. जेष्ठ सल्लागार श्री सागरशेठ कांबळे,  उधोजक श्री अमरशेठ जाधव, वंदेमातरम् प्रतिष्ठान शाखा अध्यक्ष राजु शिंदे, उपाध्यक्ष भुषण धमाधिकारी ,अमोल जगताप,भरत बाणेकर, रमेश नडगेरी  इत्यादी मान्यवर व शाखा पदाधिकारी उपस्थित होते


Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने