कोरोनाशी लढणाऱ्या योध्याना बळ यावे, अन ना.अशोकराव चव्हाण कोरोनामुक्त व्हावेत म्हणून अल्ला आणि गणरायाकडे माजी मंत्री.रमेशदादा बागवेंचे साकडे

महाराष्ट्र नवक्रांती टिम-

पुणे दि,२७ मे,
काँग्रेसचे नेते अशोकरावजी चव्हाण हे लोक प्रतिनिधी म्हणून काम करीत असता, जनतेच्या सुखदुःखात सहभागी होऊन कार्य करीत असताना ते कोरोनाबाधित झालेले आहेत.
या प्रसंगातून लवकरात लवकर ते बरे होऊन पुन्हा जनतेच्या सेवेत रुजू व्हावेत आणि पुणे शहरासह संपूर्ण जगात पसरणारा कोरोनाचा नायनाट व्हावा यासाठी माजी गृहराज्य मंत्री, पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेशदादा बागवे, व त्यांचे चिरंजीव नगरसेवक अविनाश बागवे यांनी दगडूशेठ गणपतीच्या चरणी जाऊन अभिक्षेक करून साकडे घातले आहे.
सारे जग कोरोनाच्या संक्रमणाने त्रस्त आहेत.पुणे पेठांमध्ये कोरोनाचा प्रभाव कायम आहे.कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन,आरोग्य कर्मचारी जीवाचे रान करीत आहेत.
तरी परंतु कोरोनाच्या विळख्यातून जीव वाचवणारे अनेक योध्ये कोरोनाच्या विळख्यात गोवले जात आहेत.
 त्या कोरोनाशी लढणाऱ्या योध्याना बळ यावेत, त्यांच्या प्रयत्नातुन जगातला कोरोना नाहीसा व्हावा याासाठी समश्यांचा विग्णहर्ता श्री गणरायाचरणी अभिक्षेक व प्रार्थना करुन साकडे घातल्याचे सांगितले. दि,२५ च्या रमजा ईद रोजी सुध्दा मस्लिम धर्मगुरू करवी अल्ला कडे प्रार्थना करुन दुवा मागितल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी दगडूशेठ गणपती मंदिराच्या वतीने त्यांचा भगवे वस्त्र देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या सोबत प्रवीण करपे,आदित्य गायकवाड,राजेंद्र शिरसाट, सुरेश कांबळे हे ही उपस्थित होते .
Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने