कोंढवा येथे मान्यवरांसह मेधा पाटकर यांनी दिल्या ईदच्या शुभेच्छा

               घरात रहा, सुरक्षित रहा! शासकीय नियम पाळा!!
कोंढवा येथे नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर उपस्थित होत्या
पुणे/कोंढवा दि,२७,मे-

कोरोना संसर्गाची टांगती तलवार आणि लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर रमजान ईद साठी अन्य लोकांना घरी न बोलावता शिरखूम्बा पार्सल देऊन तर कांही ठिकाणी सार्वजनिकरित्या सण साजरा करण्यात आला.
कदाचीत ही पहिली रमजान ईद आसेल ना मस्जिद मध्ये नमाज पडता अली, ना कुण्या नातेवाईक, मित्र परिवारास घरी आमंत्रित करून सणाचा आंनद साजरा करता आला.
या अनुषंगाने कोंढवा खुर्द येथेल जोती हॉटेल चौकात सार्वजनिकरित्या रमजान ईद सण साजरा करण्यात आला.याचे आयोजन इनक्रेडिबल गृप के अध्यक्ष असलम इसाक बागवान, सह आयोजक अल खादिम सलिम पाटेकरी आणि टयुबा फौ,ने यांनी केले होते. त्यामुळे ईदचा आंनद साजरा करता आला.
पुण्यातील कोंडवा खुर्द येथील रमजान ईदचे कांही क्षण 
यावेळी प्रसिद्ध आंदोलन कर्त्या मेधा पाटकर, कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, इब्राहिम खान, पत्रकार मोनिश सुपेकर आशा मान्यवरांनी भेटी देऊन शिरखुम्बाचा स्वीकार केला.आणि तमाम मुस्लिम बांधवांना सणाच्या शुभेच्छा ही दिल्या.

याशिवाय जावेद शेख, इब्राहिम शेख, लालु भाई ,चाँदभाई बलहटि, साहिल मणियार,अहमद पिरजादे, आयेशा फरास संगिता रूदराप माया डुरे, इमानीभाई, हमिदभाई, नदाफ यांनी ही सहभागी होऊन  सर्वाना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

संपूर्ण देशभर कोरोनाचा आहाकार सुरू आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे.आशा परिस्थितीत रमजान सण आल्याने  या सणावर कोरोनाचे मात्र सावट असल्याचे जाणवले.
Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने