रमजान ईदचा खर्च मदतीसाठी डिस्टणशिंगचे काटेकोर पालन करून ईद साधेपणाने साजरी


पुणे/कोंढवा दि.२५,मे- 
आज रमजान महिन्यातला शेवटचा दिवस म्हणजे रमजान ईदचा सण आहे. नविन कपडे,गोड पदार्थ,स्वादिष्ट शिरकुंबा आणि घरादारात आनंदाचे वातावरण घेेेऊन येेनारा हा सण.एकमेकांच्या मनात उत्साहाचे क्षण, मित्र परिसरात नाते गोड करणारा हा सण आहे.आपापसातील तभेद विसरून आलिंगन,गळा भेट आणि हस्तांदोलनाच्या माध्यमातून आंनद व्यक्त केला जाणारा हा सण आहे.
    परंतु सध्या कोरोना संसर्गाच्या भितीमुळे या सणावर कोरोनाचे संकट ओढवले आहे.अनेक नागरिक संकटात सापडले आहेत.त्यामुळे हा सण सर्वत्र साधेपणाने आणि घरच्या घरी साजरा करण्यात आला.प्रेणपोटी खास मित्रांना शिरखुमबाचे पार्सल देऊन सण गोड करण्यात आला.
ईद सणात महत्वाचा निर्णय:-  
ईदसाठी नवीन कपड्यांची आवर्जून खरेदी केली जाते परंतु यंदा यावेळी काही मुस्लीम बांधवांनी ईदसाठी कपडे न घेता गरिबांच्या मदतीसाठी अन्नदान,राशन,दूध वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासलेली.
       लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर सामूहिकरित्या नमाजपठणाचे होणारे धार्मिक कार्यक्रम रद्द करन घरच्या  घरीच नमाज अदा करून सण साजरा करून मानवी जीवनावर आलेले कोरोनाचे संकट दूर वकरण्यासाठी प्रार्थना/नमाज/ दुवा या सणाच्या निमित्ताने करण्यात आला.
ईद मुबारक’ म्हणा,पण गळाभेट टाळा ! :-
या वेळीं रमजान सणाचा आनंद साजरा करताना मनात एकीकडे आनंद तर दुसरीकडे कांही प्रमाणात कोरोनाच्या भीतीचे वातावरण सुद्धा सामावले आहे. डिस्टनसिंग पाळावयाच्या सूचना आहेत.कोरोनाच्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे संपूर्ण जगात हस्तांदोल करणे,गळाभेट घेणे टाळले जात आहे.याचा विचार सुद्धा यावेळी केला जात आहे.
प्रत्येकाचा जिव महत्वाचा आहे. करोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर घरीच राहून ईद साजरी करण्याचे आवाहन सध्या या समाजातील जाणकारातून केले जात आहे.त्याला मोठा प्रतिसाद मिळतोय.
उत्सव प्रिय मनुष्य स्वभाव:-
रमजान महिना सुरू झाल्यापासून तमाम मुस्लीम बांधव संपूर्ण महिनाभर कडक "रोजे"(उपहास)करत आहेत. हे रोजे रमजान ईदच्या दिवशी चंद्र दर्शन झाल्या नंतर सोडले जातात.मानव हा उत्सव प्रिय आहे.त्यामुळे मनुष्य समासात वावरत असताना,कोणताही सण उत्सव असो त्या आनंदात इतरांना सामील करून,सामावून घेऊन त्या सणाचा आंनद द्विगुणित करण्याचा प्रयत्न केला जात असतो.
जो पर्यंत मनुष्य इतरांना आपल्यात आनंदात सामावून घेत नाही तोपर्यंत त्याला खरा आंनद होत नाही.ही मानवी मनाची रचनाच आहे.मग तो कोणत्याही समाजाचा, कोणत्याही धर्माचा किंवा कोणत्याही पंथाचे असोत.इतरांचा सहभाग हा आंनद देऊन जाणारा असतो.तो शब्दात सांगता येत नाही. किंवा त्या आनंदाचे प्रमाण देता येत नाही.यंदा करोना संसर्ग आणि लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर अन्य लोकांना घरी न बोलावता त्यांना पार्सल देऊन सण गोड मानुन घेतला जात आहे.
 
लॉक डाऊनमुळे साहित्य खरेदीची गैरसोय:-
  ईद सणासाठी बनविण्यात येणाऱ्या पदार्थ व शीरखुरम्यासाठी लागणाऱ्या चुंबल, लच्छा शेवई तसेच कच्चा बनारसी, रोस्ट बनारसी शेवयां, काजू, बदाम, पिस्ता, चारोळी, किसमिस, खारीक, खोबरा,फरद, पिवळी खजूर, किमिया डेट्‌स, इत्यादि ड्राइफुट आणि इतर  लागणारे साहित्य मिळविण्यासाठी यावेळी अनेक अडचणीला सामोरे जावे लागले.


Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने