उन्मत सोशल फाउंडेशनचा मदतीचा हात,

घरात रहा, सुरक्षित रहा!

कोंढवा दि.२२,- लॉकडाऊन मुळे आर्थिक अडचणीत असलेल्या नागरिकांना उन्मत सोशल फाउंडेशनच्या वतीने मदतीचा हात म्हणुन राशन किट देण्यात आले.

कोरोना च्या संसर्गामुळे लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे अनेकांना कामधंदे नाहीत. गरीब स्थरावरील मोलमजुरी करणाऱ्या दैनंदिन मजुरीवर घर खर्च भगवणारे कुटुंबचे हाल सुरू आहेत.
आशा गरजू नागरिकांना मदत म्हणून येथील उन्मत फौंडेशनच्या वतीने कोंढवा परिसरातील कौसर बाग, एन आय बी एम अशा काही ठिकाणी लोकांना अन्न व राशन किटचे वाटप करण्यात आले आहे.

यासाठी उम्मत सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष छबिल पटेल, अध्यक्ष अजीम शेख,  जाकीर नदाफ,माज शेख, समीर छबिल पटेल इत्यादी कार्यकर्त्यांच्या वतीने वाटप करण्यात आले.

Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने