अभिनेता इरफान खान,आणि ऋषिकपूर या दोन अभिनेत्यांनी घेतला जगाचा निरोप.
पुणे दि.३०/एप्रिल - लबॉलीवूड चे सुप्रसिद्ध अभिनेते ऋषीं कपूर यांचे मुंबईच्या रिलायन्स फाऊंडेशन इस्पितळात उपचार दरम्यान मृत्यु झाल्याने फिल्म इंद्रस्टीचे कधी न भरून येणारे मोठे नुकसान झाले आहे
बॉलीवूड चे सुप्रसिद्ध अभिनेते ऋषीं कपूर यांना दि.२९ च्या रात्री उपचारासाठी मुंबईच्या रिलायन्स फाऊंडेशन च्या इस्पितळात उपचारसाठी दाखल केले असता दि.३० च्या सकाळी उपचार दरम्यान निधन झाले. कालच दि. २९ एप्रिल २०२० रोजी हॉलीवूड आणि बॉलिवुड उत्कृष्ठ चित्रपट अभिनेते इरफान खान यांचे कोकिळाबेन रूग्णालयात कँसर आजारांवर उपचार घेत असताना दुःखद निधन झाले.
इरफान खान ने विविध चित्रपटात काम केले आहेत.त्यांच्या "पान सिंह तोमर या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. शिवाय अनेक इंग्रजी व हिंदी चित्रपटात मुख्य भुमिका असलेले अनेक चित्रपट यशस्वी झाले आहेत.त्यापैैकी पिकू, सलाम बॉम्बे, मकबूल असे अनेक हिंदी चित्रपट गाजले. इंग्रजी भाषेमधील " स्लमडॉग मिलेनियर हाा खूप गाजला.
फिल्मी दुनियेत इरफान खान च्या निधनाच्या दुःखाची लहर ताजी असतानाक दुसऱ्याच दिवशी दि.३० एप्रिल रोजी झालेल्या ऋषिकपूर च्या निधनाने फिल्म इंडस्ट्रीजला दुसरा झटका बसलाआहे.
२९ एप्रिल सायंकाळी त्यांची तब्बेत बिघडल्याने त्यांना इस्पितळात दुपचारासाठी दाखल केले असता उपचार दरम्यान दि.३० रोजी त्याने इस्पितळातच अखेरचा स्वास घेतला. ऋषिकपूरला २०१८ मध्ये कँसर झाल्याचे निष्पन्न झले होते. बाहेर देशात जाऊन यावर त्याने उपचार ही घेतले होते.
अभिनेते ऋषी कपूर यांनी बाल वयापासूनच अभिनयाला सुरवात केली होती. त्याचा पहिला चित्रपट मेरा नाम जोकर चांगलाच गाजला.त्यानंतर एका पाठोपाठ अनेक चित्रपट हिट होत गेले. त्यापैकी बॉबी, हिना, अमर अकबर,अंथोनी,चांदणी,प्रेम रोग,प्रेम ग्रंथ,दिवाना, याराना, लैला-मजनु असे जवळपास ९3 चित्रपटांत मुख्यभूमिकेत उत्कृष्ठ काम केलेले आहे. त्यांच्या जाण्याने फ़िल्म इंडस्ट्रीजचे कधी न भरून येणारे नुकसान झाले आहे.
या दोन्ही कलाकारांची फिल्म इंडस्ट्रीजला अनेक उत्कृष्ठ चित्रपट दिलेले आहेत. त्यांनी त्यांच्या अभिनयाने चाहत्यांना अक्षरशः भूरळ घातली. या दोन्ही अभिनेत्याच्या जाण्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये आणि फिल्मी चंदेरीदुनियत शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने फ़िल्म इंडस्ट्रीजचे कधी न भरून येणारे नुकसान झाले आहे.
💐 ऋषी कपूर, इरफान खान को जमाना मिस करते करेगाा!💐
२९ और ३० एप्रिल २०२० को हमेशा याद रखेेगा!
💐भावपूर्ण श्रद्धांजली💐
-------------------
------ 💐 ------
-- 💐 --