महात्मा बसवेश्वर यांची जयंती आलूर ग्रामपंचायत कार्यालयात साजरी करण्यात आली

आलूर ग्रामपंचायत कार्यालयात बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली


आलूर दि.२७:- समतानायक, लिंगायत धर्म संस्थापक, जंगतज्योती, महात्मा बसवेश्वर यांची जयंती येथील ग्रामपंचायत कार्यालयात साधेपणाने करण्यात आली

आलूर ता उमरगा येथे प्रत्येक वर्षांला बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात सार्वजनिकरित्या साजरी होत असते.जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. भव्य मिरवणुक काढण्यात येते. यावेळी मात्र  प्रतिवर्षाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. 

कोरोनाच्या संकटामुळे साधेपणाने मोजक्या संख्येत ग्रामपंचायत कार्यालयात साजरी झाली. ग्रामपंचायत व बसव शरण संगम बहुद्देशिय सामाजीक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत कार्यालयात प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी कार्यालयात फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून जयंती साजरी करण्यात केली.
यावेळी ग्रामपंचायत सरपंच सुरेश बोळदे,नागेश पाटील,सुरेश इंगळे,हणमंत संके,स्वामी,उपस्थित होते.

Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने