महात्मा बसवेश्वर यांच्या ८८९ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याला आणि विचाराला कोटी कोटी प्रणाम!

दि.26 प्रतिनिधी: १२ व्या शतकातील परिवर्तनवादी क्रांतिकारी युगपुरुष महात्मा बसवेश्वर यांच्या ८८९ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याला आणि विचाराला कोटी कोटी प्रणाम!             


वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया दिवशी  कर्नाटकच्या विजयपूर जिल्ह्यातील बसवनबागेवाडी येथे १२ व्या शतकात महात्मा बसवेश्वरांचा जन्म झाला.
 इसवी सन ११०५ ते ११६७ हा बसवेश्वरांचा ६२ वर्षांचा जीवनकाळ का सामाजिक परिवर्तनाचा पाया आहे.
या काळात जातीभेद,अंधश्रद्धा,कर्मकांड,सतीप्रथेमुळे समाज पोखरला गेला होता.महात्मा बसवेश्वरांनी त्याविरुद्ध समाज सुधारणेची चळवळ चालवली.प्रत्येकांनी चरितार्थ चालविण्यासाठी कोणताही व्यवसाय केला पाहिजे.स्वाभिमानाने जगायला शिकवण दिली.काय कवे कैलास 'अर्थात श्रम हेच स्वर्ग' असल्याची शिकवण घालुन दिली.

महात्मा बसवेश्वरांनी १२व्या शतकात अनुभव मंडपाच्या माध्यमातून लोकशाहीची पाळेमुळे रोवली.
सामाजिक जीवनात विविध जाती-धर्मातील स्त्री-पुरुषांना गळ्यात इष्टलिंग परिधान करन्याचा अधिकार दिला.दलित-मागासवर्गीयांच्या घरी स्वतःभोजन केले.
अनुभव मंडपातील शिवशरण यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रेरणेने शिव दीक्षा स्वीकारून ब्राह्मण मधुवरसाने आपल्या मुलीचा विवाह ढोर जातीतील हरळय्याच्या मुलाशी लावून दिला.परंतु सनातन्यांनी हरळय्या व मधुवरसाला ठार केले.सर्वत्र आहाकार माजवला.अन्याय अत्याचार घडवुन दहशत माजवली.बिज्जल राजाचाही वध घडवून आणला.
त्याकाळी सुरू केलेली मानवतावादी विचारसरणी सनातन्यांनी पायदली तुडवली असली तरी आज त्यांचे विचार
आज संपूर्ण मानव जातीला योग्य दिशा देत आहेत.त्यांच्या विचाराला नतमस्तक होत आहेत.
आशा महान परिवर्तनवादी क्रांतिकारी युगपुरुष महात्मा बसवेश्वर यांच्या ८८९ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याला आणि विचाराला स्टार महाराष्ट्र नवक्रांती च्या वतीने त्यांना कोटी कोटी प्रणाम! 
Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने