सामाजिक कार्यकर्ते सागर कांबळे यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

 


पुणे | प्रतिनिधी, 

मल्लीनाथ गुरवे यांजकडून -

सामाजिक क्षेत्रातील विविध उपक्रमांत उल्लेखनीय कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते सागर कांबळे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. समाजसेवा, जनजागृती व सामाजिक बांधिलकीच्या कार्यात त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ज्ञानविकास प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात संस्थापक अध्यक्ष उदयसिंह मुळीक यांच्या हस्ते सागर कांबळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी विविध मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ज्ञानविकास प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात संस्थापक अध्यक्ष उदयसिंह मुळीक व सौ मुळीक यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते सागर कांबळे यांना जीवनगौरव पुरस्कार देताना

Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने

Featured Post