उमरग्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आढावा बैठक उत्साहात पार पडली

पुणे प्रतिनिधी-

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमरगा काँग्रेस कार्यालयात उमरगा काँग्रेस कमिटीच्या वतीने आढावा बैठक पार पडली. या बैठकीत धाराशिव जिल्ह्याचे युवा नेते तसेच युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री. अश्लेष भैय्या शिवाजीराव मोरे साहेब प्रमुख उपस्थित होते.

या बैठकीत निवडणुकीच्या अनुषंगाने विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. काँग्रेस पक्षाची रणनीती, कार्यकर्त्यांचे संघटन, मतदारांपर्यंत पोहोचण्याचे कार्यक्रम आणि प्रचाराचे नियोजन यावर सविस्तर विचारमंथन झाले. 

बैठकीत तालुका अध्यक्ष अर्जुन भाऊ बिराजदार, जिल्हा सरचिटणीस विजय भैय्या वाघमारे, माजी नगरसेवक एम. ओ. पाटील, माजी सभापती नानाराव भोसले, तसेच जेष्ठ नेते मधुकर यादव, ऍड. पोतदार साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.


यासोबतच लोहारा, उमरगा, व अन्य तालुक्यांमधील विविध सेलचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बैठकीत सोशल मीडिया रणनीतीपासून तर मतदार संवादापर्यंत सर्व अंगांवर लक्ष केंद्रित करण्यात आले.

अश्लेष मोरे साहेबांनी आपल्या भाषणात युवकांची जबाबदारी, गावपातळीवरील संघटन बळकट करणे आणि जनतेच्या प्रश्नांवर काँग्रेस पक्षाची भुमिका अधोरेखित केली.

ही बैठक काँग्रेस पक्षासाठी आगामी निवडणुकांमध्ये सशक्त पाऊल ठरणार आहे, असा विश्वास सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने