मुरुम शहर पत्रकार संघाकडून बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला

मुरुम/प्रतिनिधी

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने मुरूम शहर  पत्रकार  संघाच्यावतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दि. ६ जानेवारी सोमवार रोजी  अभिवादन कार्यक्रम साजरा करण्यात आला . 

येथील  श्री. माधवराव पाटील महाविद्यालयात पत्रकार दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम झाला. त्यानंतर मुरूम शहर पत्रकार यांचीएक बैठक संम्पन्न झाली. या बैठकीत मुरूम शहर पत्रकार महासंघाची नव्याने कार्यकारिणीची निवड करण्यात आली. नविन पदाधिऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा  दिल्या गेल्या.


नविन कार्यकारिणी मध्ये  शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी  रामलिंग पुराणे, उपाध्यक्षपदी नहिरपाशा मासूलदार, सचिवपदी मोहन जाधव, सहसचिवपदी अजिंक्य मुरूमकर आणि कोषाध्यक्षपदी सुधीर पंचगल्ले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

यावेळी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष महेश निंबरगे, पत्रकार रफिक पटेल, प्रा. डॉ. महेश मोटे,रवी अंबुसे, बालाजी व्हनाजे, जगदीश सुरवसे, नामदेव भोसले, विशाल देशमुख, प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले, भीमाशंकर पांचाळ, योगेश पांचाळ, हुसेन नुरसे, इमरान सय्यद आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.

तर माधवराव पाटील महाविद्यालयात प्राचार्य अशोक सपाटे, प्राध्यापक सी.टी. बिराजदार,प्रा.सोलनकर,प्राध्यापिका शीला स्वामी यांच्यासह महाविद्यालयातील प्रधायपक उपस्थित होते

Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने

Popular Items