नळदुर्ग/प्रतिनिधी- रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत मुरटा पाटीवर नळदुर्ग येथील महामार्ग पोलिस केंद्राच्यावतीने वाहनचालकासाठी जनजागृती अभियान राबवण्यात आले.
राज्याचे अपर महासंचालक डॉ. सुरेश कुमार मेकला तसेच पोलीस अधीक्षक महामार्ग छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र श्रीमती रूपाली दरेकर , विभागाचे पोलीस उपअधीक्षक डीसले, पो.नि.चौधरी छत्रपती संभाजीनगर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील अभियान राबवण्यात आले.
सोलापूर ते हैदराबाद NH 65 या राष्ट्रीय महामार्गावरील मुरटापाटी येथे महामार्ग पोलिसांनी वाहनचालक, प्रवाशी, स्थानिक यांना वाहतुक नियमाबाबत माहीती देवुन मार्गदर्शन केले गेले.
यामध्ये भरधाव वेगाने वाहन चालवू नये व चुकीच्या पध्दतीने ओव्हर टेक करू नये.,धोकादायक रित्या रस्त्यावर ऊस ट्रॅक्टर उभा करू नये, तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. ऊस वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनधारकांनी आपल्या वाहनास पाठीमागील बाजूस व चारही दिशांनी रिफ्लेक्टर लावून घ्यावेत.
महामार्गावर ऊस वाहतूक करीत असताना मोठ मोठ्याने गाणी लावून वाहन चालवू नये. मद्यपान करून कोणतेही वाहन चालवू नये. वाहन परवाना/कागदपत्रे सोबत बाळगणे,वाहन चालविताना मोबाईलचा वापर करू नये, वेग मर्यादाचे पालन करावे,ओव्हरटेक करताना उजव्या बाजूने वाहन चालवावे, मोटर वाहन कायद्याअंतर्गत वाढ झालेल्या दंडाच्या रकमेबाबत माहिती दिले तसेच ट्रॅक्टर व ट्रकचालकाने सोबत क्लीनर ठेवणे बाबत सूचना दिल्यादेण्यात आल्या.
वाहनांवर विशेषतः पाठी मागील बाजू रिफ्लेक्टर लावावे.,महामार्गावर धोकादायक परिस्थितीत कोणतेही वाहन थांबवू नये,वाहन चालवताना वाहतूक चिन्हे पाहून त्या सूचना प्रमाणे वाहन चालवावे,ज्या वाहनांवर प्रलंबित दंड आहेत त्यांनी म.पो.केंद्राशी संपर्क साधून तात्काळ दंड भरून घ्यावेत ,विदाऊट हेल्मेट वाहन चालवू नये.
ट्रिपल सीट वाहन चालवु नये अश्याप्रकारे जनजागृती करण्यात आले यावेळी APIअमृता पटाईत व केंद्रातील कर्मचारी यासाठी पुढाकार घेतला