मुंबई, मंत्रालय - दि. १० - नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने मोठे यश मिळाले. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच पदभार स्वीकारल्यानंतर सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांच्या मदतीसाठी स्थापन केलेल्या मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख म्हणून आजच श्री. रामेश्वर नाईक यांची निवड करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख पदी रामेश्वर नाईक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी त्यांचे सत्कार करून अभिनंदन केले.
यावेळी बोलताना उमेश चव्हाण म्हणाले कि, "गेली अनेक वर्षे सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा मोफत मिळाव्यात म्हणून संघर्ष करणारा कार्यकर्ता अशी रामेश्वर नाईक यांची ओळख आहे. त्यांनी गेली अनेक वर्ष सर्वसामान्य रुग्णांना उपचारांसाठी मदत मिळवून दिली.
यावेळी सत्काराला उत्तर देताना रामेश्वर नाईक म्हणाले कि, "मंत्रालयातील विशेष वैद्यकीय मदत कक्ष स्थापन झाल्यापासून सदरील कक्षाचा प्रमुख म्हणून हजारो रुग्णांना कोट्यावधी रुपयांची मदत मिळवून दिली. सोबतच मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख पदी निवड झाल्याने जबाबदारी वाढली असून माझ्यापर्यंत पोहोचणाऱ्या प्रत्येक रुग्णाला लागेल ती यथोचित मदत करण्याचा प्रयत्न करणार असून पैसे नाहीत म्हणून कोणताही रुग्ण वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी बोलून दाखवले.
यावेळी रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांचा सत्कार आणि अभिनंदन केले.
याप्रसंगी विश्वशांती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रतीक कांबळे, रुग्ण हक्क परिषदेच्या पुणे शहराध्यक्ष सौ. अपर्णा मारणे साठ्ये, परिषदेचे केंद्रीय कार्यालय प्रमुख दिलीप साळुंके सह पदाधिकारी उपस्थित होते.