आलूर दि. 10 - उमरगा प्रतिनिधी उमरगा तालुक्यातील केसर जवळगा येथील महात्मा गांधी विद्यालय येथे विद्यार्थ्यांना रक्तवर्धक गोळ्या दिल्याने उलटीचा त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात उपचार करण्यात आले.
या घटनेची चौकशी व पहाणी करण्यासाठी तालुक्याचे शिवसेना ठाकरे गटाचे नूतन आमदार प्रवीण स्वामी यांनी दि. 11 रोजी केसर जवळगा या शाळेत भेट देऊन विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
सोमवारी दि. 9 डिसेंबर रोजी शाळेतील विद्यार्थ्यांना रक्तवर्धक गोळ्या दिल्याने मळमळ उलटीचा त्रास होवू लागल्याने तात्काळ विद्यार्थ्यांना मुरूम ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 19 विद्यार्थ्या पैकी चार जणांना सलाईन लावून औषध उपचार करावे लागले. विद्यार्थ्यांना उपचार करून त्यांच्या गावी सुखरूप पाठवण्यात आले.
याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी नूतन आमदार प्रवीण स्वामी यांनी बुधवारी केसर जवळगा येथील या शाळेत भेट देऊन विद्यार्थ्यांचे व नातेवाईक याच्याकडून सविस्तर माहिती जानून घेतली.आणि भविष्यात अशा घटना पुन्हा होऊ नये यासाठी शिक्षक व पालकांनी खबरदारी घ्यावी अशा सूचना ही त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी आमदार श्री स्वामी बोलताना म्हणाले की विद्यार्थ्यांनी रिकाम्या पोटी गोळ्या घेऊ नये पालकांनी व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांनी भरपूर खेळावे,भरपूर अभ्यास करा aniआणि संस्थेचे नाव अजरामर करा प्रशासनाने असा अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष काळजी घ्यावी याबाबत योग्य ते चौकशी करण्याचे आदेश यापूर्वी देण्यात आले आहेत
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत भुरे बसवराज वरनाळे मुख्याध्यापक डी एस कुलकर्णी तंटामुक्त अध्यक्ष शब्बीर इनामदार माजीसरपंच अमोल पटवारी प्रभाकर हुलगजे संदीप पाटील. उमेश कारभारी आदी ग्रामस्थ शिक्षक उपस्थित होते.
यावेळी आमदार श्री स्वामी यांच्या यांनी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप वाटप करून संवाद साधला.