केसर जवळगा शाळेला डॉ ख्वाजालाल ढोबळे यांनी दिली भेट


केसरजवळगा - वार्ताहर (अमित राजपूत)

उमरगा तालुक्यातील केसर जवळगा येथील महात्मा गांधी विद्यालयात विद्यार्थ्यांना दि. 9 सोमवार रोजी रक्तवर्धक गोळ्या दिल्याने विद्यार्थ्यांना उलटीचा आणि मळमळ होणे असा त्रास  सुरु झाल्याने सर्व विद्यार्थ्यांवर मुरूम येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. 19 पैकी 4 विद्यार्थ्यांना सलाईन लावावे लागले. उपचारा नंतर त्यांना परत केसर जवळगा येथे पाठवण्यात आले.

 या घटनेची सविस्तर माहिती घेण्यासाठी महाराष्ट्र रुग्ण हक्क परिषदचे कार्यकर्ते व मुरूमचे डॉ.खाजालाल ढोबळे यांनी गांधी विद्यालयाला( दि.12 ) गुरुवार रोजी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी बोलून विचारपूस केली.

 त्यांना अभ्यासासोबत दररोजच्या आहारात पौष्टिक युक्त दूध,अंडे, हिरव्या पाले-भाज्या, गाजर,केळी आहारात घ्यावे, मोबाईल वापरणे टाळावे, चिप्स, कुरकुरे असे तेलकट पदार्थ खाऊ नये दररोज योग प्राणायाम करणे गरजेचे असल्याची माहिती देऊन सविस्तर मार्गदर्शन केले.

 त्यानंतर मुख्याध्यापक कुलकर्णी व  शिक्षक कर्मचाऱ्यासोबत चर्चा केले.

Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने