आचारसंहितेच्या काही तास आधी ७ आमदारांचा शपथविधी म्हणजे महाराष्ट्रातील जनतेची फसवणूकच : मुकुंद किर्दत्त आप


पुणे : आचारसंहितेच्या काही तास आधी ७ आमदारांचा शपथविधी ही महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक असून बहुदा भाजपा ला  निवडणुकांमध्ये आपला पराभव स्पष्ट दिसत असल्यानेच हे शेवटच्या तासात मलाईवर हात मारण्याचा हा प्रकार आहे असा आरोप : आप च्या वतीने करण्यात आलेला आहे.

मुंबई उच्च न्यायालयातील प्रलंबित खटला निष्फळ ठरविण्याचे हे अपमानकारक कृत्य आहे. आम आदमी पार्टीने आज राज्यपाल कोट्यातून 7 आमदारांची नियुक्ती करण्यात आलेला निर्णय म्हणजे  महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक असल्याचे म्हटले आहे.

भाजप आणि सत्ताधारी पक्षाकडून केवळ 7 जणांना नामनिर्देशित केले गेले नाही तर त्यांना राज्यपालांची एका रात्रीत मंजुरी मिळाली. तसेच, भारत निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली असली तरी, आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नामनिर्देशितांना कार्यालयीन वेळेत शपथ देण्यात आली.

आधीच्या राज्यपालांनी मागील सरकारच्या मंत्रिमंडळाच्या शिफारसी असतानाही ह्या वर निर्णय घेतला नव्हता. या दिरंगाईला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आणि महाराष्ट्र सरकारने न्यायालयाला आश्वासन दिले होते की, या प्रकरणाचा निर्णय होईपर्यंत या नियुक्ती बाबत पावुले उचलली जाणार नाहीत.

त्यामुळेच ही नियुक्ती म्हणजे महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक आणि घटनात्मक प्रक्रियेचा निव्वळ दुरुपयोग आहे. सत्ता बळकावण्याचा हा लाजिरवाणा प्रयत्न आहे आणि बॉम्बे हायकोर्टाच्या अंतर्गत सध्याची कार्यवाही निष्फळ ठरविण्याचा हा अपमानकारक प्रकार आहे असे आम आदमी पार्टी प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी म्हंटले आहे.

Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने