उमरगा येथे मान्यवरांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान करून दर्पण दिन बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी.

 

उमरगा दि,६ जाने-  (लकी गुरवे यांजकडून) 

दर्पण दिनानिमित्त उमरगा-लोहारा तालुका आमदार मा.श्री. ज्ञानराज चौगुले साहेब यांच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.

बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दर्पणदिन निमित्य शनिवार ६ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी उमरगा व लोहारा तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान व स्नेहसंवाद कार्यक्रम श्रीराम मंगल कार्यालय, मेन रोड, उमरगा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.मा. श्री जितेंद्र शिंदे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती उमरगा हे कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन धाराशिव चे माजी खासदार श्री रविंद्र गायकवाड होते.यावेळी  कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते व मार्गदर्शक म्हणून मा. श्री संजय जेवरीकर जेष्ठ पत्रकार लातूर, धाराशिव श्री दिलीप पाठक-नारीकर होते.

मुरूम येथील पत्रकार रामलिंग पुराणे व राजेंद्र कारभारी 

यासह युवा नेते मा. श्री किरण गायकवाड, मा. आकांक्षाताई ज्ञानराज चौगुले  मा. श्री मोहन पणुरे शिवसेना जिल्हा प्रमुख धाराशिव मा. सौ. वैशालीताई खराडे नगराध्यक्षा, न.प. लोहारा इत्यादी मान्यवर उपस्थित होते.यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींना फेटा, शाल, स्मृती चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने