उमरगा उस्मानाबाद येथे भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाची महापरिनिर्वाण दिनी युगपुरुष डॉ.अंबेडकर यांना मान वंदना सलामी व शहरातुन शांतता रॅली काडून आदरांजली

उमरगा-(लक्ष्मीकांत गुरवे) उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिन निमित्य प्रभात फेरी व मानवंदना देवुन महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.
‌‌
दी.६ डिसेम्बर रोजी सकाळी ठिक 10 वाजता येथील समता सैनिक दलाच्या वतीने जनरल सलामी दिल्या नंतर उपस्थितांनी पुष्प वाहून महामानवास आदरांजली वाहिली.
यावेळी. बौद्धाचार्य मिलिंद डोईबळे, व अस्मिता सुरवसे, शितल गायकवाड यांनी बुद्ध वंदना व सर्व गाथा पठण केल्या.

यावेळी उपासक निखिल गायकवाड, जिवन सुर्यवंशी, उद्धव गायकवाड, नवनाथ गायकवाड, जगन्नाथ कांबळे, कमलाकर कांबळे, राजेंद्र कांबळे, चंद्रकांत गायकवाड, राघोबा गायकवाड, शिवाजी कांबळे व मनोहर सुरवंशी यांची प्रमुख उपस्थितीती होती.
त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता सम्पूर्ण तालुक्यातील अनेक बौद्ध उपासक व उपाशिका यांनी पांढरे वस्त्र परिधान करून शांतता रॉलीत सहभाग घेतला होता.

वेळी मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूने लाईन करून समता सैनिक दल व उपासक उपासिका यांनी घोषणा देत रॅली यशस्वी करण्यास मद्त केली.

या शांतता संदेश रॅलीचे उद्घाटन उपासक श्रीधर सरपे व संतोष सुरवसे यांच्या हस्ते झाले.

संयोजक व समता सैनिक दलाने उत्तम प्रकारे कार्यक्रम नियोजन व आयोजन केल्याने तालुक्यातील आंबेडकर अनुयायी यांनी समाधान व्यक्त केले आहे.

यावेळी आदरणीय सन्माननीय नेते हारीश डावरे, राम गायकवाड, धीरज बेळंबकर प्रभाकर गायकवाड, प्रा. संजीव कांबळे, प्रा. सूर्यकांत वाघमारे, चंद्रकांत कांबळे, अॉड. हीराजी पांढरे, अविनाश भालेराव, कीरण कांबळे, राजेंद्र सुर्यवंशी, दयानंद कांबळे, बाबुराव गायकवाड,सुरेश गायकवाड, जगजीवन झाकडे, दीलीप गायकवाड, तात्याराव मांदळे, शिवानंद अलुरकर, बालाजी गायकवाड, आनंद कांबळे, अश्विनी कांबळे, केरुताई सुर्यवंशी, चंद्रकला गायकवाड, रंजना सुरवसे भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाचे पदाधिकारी तसेच उमरगा शहरातील उपासक, उपासीका व ग्रामीण शाखा अध्यक्ष यांच्या सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने