हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजभिक्षेक दिन सोहळा कोंढवा येथे उत्साहात साजरा करण्यात आला

पुणे: कोंढवा खुर्द येथे श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज मंदिर समोर ध्वज फडकवतांना उपस्थित ग्रामस्थ

पुणे: कोंढवा खुर्द येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना ग्रामस्थ
-------------------------------
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजभिक्षेक दिन सोहळा दि,६ जून रोजी कोंढवा खुर्द येथे उत्साही वातावरणात पुतळ्यास अभिक्षेक व पुष्पहार अर्पण करून उंच भगवा पताका फडकवून साजरा करण्यात आला.
यावेळी गावातील अनेक शिवप्रेमी ग्रामस्थ व विविध पक्षाचे राजकीय  लोकप्रतिनीधी, आणि सामाजिक  कार्यकर्ते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय मार्गदर्शक नियम पाळत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या  पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व चरणी अभिवादन करून स्वराज्यभिक्षेक दिन साजरा केला.व शेवटी जिलेबी गोड पदार्थ वाटून आंनदाने शिवजन्मोत्सव सोहळा  साजरा केला.

Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Featured Post