पुणे महानगरपालिका व काँग्रेस पक्षाचे गटनेते मा.आबा बागुल यांच्या पुढाकाराने गणेश कला क्रीडा मंच मध्ये कोविड सेंटर ची उभारणी

पुणे दि,,२९ एप्रिल- पुणे महानगरपालिका व काँग्रेस पक्षाचे गटनेते मा.आबा बागुल यांच्या पुढाकाराने गणेश कला क्रीडा मंच मध्ये कोविड सेंटर ची उभारणी  कऱण्यात अली आहे.
कोरोना बाधितांची संख्या दिवसेंददिवस झपाट्याने वाढत चालल्याने त्यांच्यावर उपचार करण्यासाठी रुग्णालये कमी पडत आहेत.
रुग्णांना वेळेवर उपचार मिळावा म्हणून पुणे महानगरपालिका व काँग्रेस पक्षाचे गटनेते मा.आबा बागुल यांनी  सुरू केलेले कोविड सेंटर मूळे रुग्णांचा जीव वाचविण्यास मदत होवु शकेल.

अतिशय चांगल्या प्रकारच्या सुविधा या ठिकाणी करण्यात आल्या आहेत. विशेषतः या ठिकाणी आँक्सिजन बेड सह रुग्णांना लागणारे अगदी लहान सहान गोष्टींचा विचार करून या ठिकाणी त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष मा. रमेशदादा बागवे व काँग्रेस पक्षाचे गटनेते मा. आबा बागुल यांनी कोविड सेंटर मध्ये कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या याची पाहणी केली.

या वेळी नगरसेवक मा. अविनाशजी बागवे, मा. संजयजी साठे, अध्यक्ष मातंग एकता आंदोलन युवक आघाडी मा. विनोदभाऊ शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते.
Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने