कोंढवा दि,२३ एप्रिल-२१: पेशंन्टला लिहुन दिलेले प्रिस्क्रीप्शन गैरमार्गाने ससुन हॉस्पीटलच्या संजीवनी मेडिकल स्टोअर्स मधुन खरेदी करून इंजेक्शन चढ्या दराने विक्रीचा काळाबाजार होत असल्याचे उघड.
पुण्यात कोविड-19 अनेकांचे संसार उध्वस्त करीत आहे अशा प्रसंगी कोविड रूग्णांना वैद्यकिय सहाय्यता पुरविण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था,प्रशासन प्रयत्नशिल आहेत.तर कांहीजन मानवतेचा विश्वासघात करीत आहेत.
रेमडिसीवरची टंचाई निर्माण त्याचे चढ्या भावाने विक्री करण्याचा धंदा केला जात आहे.
असाच एक प्रकार कोंढवा पोलिसांनी उघडकीस आणला असून ससून रुग्णालय मेडीकल येथून हा प्रकार होत असल्याचे समोर आले आहे.
रूग्णांना डॉक्टर रेमडिसीवर इंजेक्शनचे प्रिस्क्रीप्शन लीहून देतात. ते प्रिस्क्रीप्शन चोरी करुन ससुन हॉस्पीटल येथील मेडिकल स्टोअर्स मधुन खरेदी करून ते विनापरवाना चढ्या दराने विक्री करणार्याला कोंढवा पोलीस यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एकाला अटक केली आहे. त्याच्याजवतीळ 2 रेमडिसीवर इंजेक्शन सुद्धा हस्तगत केले आहे.
रेमडिसीवर इंजेक्शनची विनापरवाना चढ्या दराने विक्री करणारा फार्मासिस्ट अंकित विनोद सोळंकी (वय २६, रा.फ्लॅट नं-३०१, सुखवानी कॉम्पलेक्स, ११ नं बस स्टॉप, दापोडी, पुणे) असे कोंढवा पोलीसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
कोंढवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
बुधवार दि.२१ एप्रिल २०२१ रोजी कोंढवा पोलीस ठाण्याचे मा.पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री.शब्बीर सय्यद हे हद्दीत कायदा-सुव्यवस्थेकामी परीसराचा आढावा घेत असतांना एक संशयित इसम हा कोंढवा खुर्द च्या कोणार्क पुरम समोरील जायका हॉटेल येथे रेमडिसीवर इंजेक्शन विनापरवाना चढ्या दराने विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
त्यानुसार मा.पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री.शब्बीर सय्यद यांनी बनावट ग्राहक तयार करून त्याच्याकडे पाठवले असता .
इंजेक्शनची विक्री करणार्या संशयित इसमाने कोंढवा येथील जायका हॉटेल जवळच्या आडबाजुस भेटावयास बोलवुन त्याने दोन इंजेक्शनचे प्रत्येकी १०,०००/- रुपयांची मागणी केली. त्यावेळी बनावट ग्राहकाने इशारा करताच कोंढवा पोलीस ठाणेचे मा.पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री.शब्बीर सय्यद यांच्या अधिपत्याखाली तपास पथकातील प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे व पोलीस अंमलदार यांनी छापा टाकून रेमडिसीवर इंजेक्शनची विक्री करणारा फार्मासिस्ट अंकित विनोद सोळंकी (वय २६, रा.फ्लॅट नं-३०१, सुखवानी कॉम्पलेक्स, ११ नं बस स्टॉप, दापोडी, पुणे) याला शिताफीने ताब्यात घेतले.
कोंढवा पोलिसांनी ताब्यात घेतलेला फार्मासिस्ट अंकित सोलंकी याची रेमडिसीवर इंजेक्शनाबाबत सखोल चौकशी केला असता आरोपी याने रेमडिसीवर इंजेक्शन हे डॉक्टरांनी ज्या कोरोना झालेल्या पेशंन्टला आवश्यकता आहे. त्यांना प्रिक्रीप्शन लिहुन दिलेले असतात ते प्रिस्क्रीप्शन चोरी करुन ससुन हॉस्पीटल येथील संजीवनी मेडिकल स्टोअर्स मधुन खरेदी केलेले इंजेक्शन चढ्या दराने विक्री करण्यासाठी आणल्याची कबुली दिली. त्याप्रमाण फार्मासिस्ट आरोपी अंकित सोलंकी याच्याविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गु.र.नं.३३५/२०२१, भादंवि कलम ४२० सह परिच्छेद २६ औषध किंमत नियंत्रण आदेश २०१३, सह वाचन कलम ३(२)(सी) जीवनावश्यक वस्तुंचे अधिनियम १९५५ चे उल्लंघन दंडनिय कलम ७(१)(ए)(२) तसेच औषध व सौंदर्य प्रसाधणे कायदा-१९४० चे कलम १८(सी) चे उल्लंघन दंडनिय कलम२७(बी)(२), कलम-१८ए व कलम २२(ए)(सीसीए) चे उल्लंघन अनुक्रमे दंडनिय कलम २८ व कलम २७ डी प्रमाणे गुन्हा दाखल करून फार्मासिस्ट आरोपी अंकित सोलंकी याला गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.