पुणे कोंढवा येथे जन आंदोलन संघर्ष समिती, इनक्रेडिबल गृप, किसान आणि मजदुर यांच्या वतीने शेतकरी आणि कामगार "याच्या नविन कायद्याविरोधात "फिरते किसान बाग जथ्था ची " सुरूवात करण्यात आली.
केंद्र सरकारच्या भांडवलदार धार्जिण्या आणि जुलमी शेतकरी, कामगार, व शैक्षणिक नवीन धोरण कायद्याच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालय व विविध भागात जनजागृती अभियान आंदोलन केले जात आहे.
दि.४ जानेवारी रोजी कोंढवा खुर्द च्या NIBM चौकात जनजागृतिसाठी कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी केंद्र सरकार च्या शेतकरी विरोधी भूमिकेवर पदाधिकाऱ्यांनी कडाडून हल्ला करत कायदा रद्द करा नाहीतर २६जानेवारी ला संपूर्ण पुण्यात चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला.
यावेळी ऍड. प्रकाश मस्के, सुभाष वारे,इत्यादींनी केंद्रसरकरचे नवीन कायदे भांडवलदार धार्जिणे कसे आहेत याची सविस्तर माहिती व या नवीन कायद्यामुळे सर्वसामान्य, शेतकरी ,कामगार कष्टकऱ्यांचे जीवन कसे उधवस्थ होतील याची माहिती सांगून याला सर्व स्थरातून कास विरोध करता येईल यावर अनेकांनी मनोगत व्यक्त केले.
यानंतर दिल्ली येथील सुरु असलेल्या किसान आंदोलनात शहिद झालेले आंदोलनकारी किसान यांना आदरांजली अर्पण करून. अदानी अंबानी यांच्या उत्पादनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.
दिल्ली येथील सुरु असलेल्या किसान आंदोलनात शहिद झालेले आंदोलनकारी किसान यांना आदरांजली अर्पण करून. अदानी अंबानी यांच्या उत्पादनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी, जन आंदोलन संघर्ष समिती, जन आंदोलन समन्वय समिती, स्वराज अभियान,नव समाजवादी पर्याय, युक्रांत, परिवर्तन, सामाजिक संस्था हडपसर राष्टृसेवादल, इनक्रेडिबल समाज सेवक गृप, इनक्रेडिबल किसान व मजदुर संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
इब्राहीम खान दत्ता पाखरे एडवोकेट संतोष मस्के सुभाष वारे अरविंद जगताप ,(जक्का) काँग्रेस सेवादल बिबवे तमन्ना, पत्रकार मल्लिनाथ गुरवे, इनामदार लताताई भिशे ललिता गायकवाड डॉक्टर केतकी माळवदे श्रावणी बुवा संदीप बर्वे ,यासीन पिरजादे सल्लाउद्दीन शेख, जमिर सल्लाउद्दिन शेख बशीर सय्यद फरदीन खान प्रकाश कदम विना कदम शाहिन संदगी सचिन आल्हाट निखिल जाधव साहिल मणियार नितीन बशरूर ,हबिब शेख जानमोहम्मद, इबराहिम शेख, विजय मोरे राजू सय्यद शानू पठाण मुजम्मिल शेख हाजी इम्तियाज अल्लाउद्दीन शेख समिना मेमण, अकबर मेमन असे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते,