ऐरोली नवी मुंबई-
ऐरोली सेक्टर १६ येथील सुप्रसिद्ध वेलकम स्वीट अँड स्नॅक्स कॉर्नर येथे चांगल्या प्रकारचे खाद्यपदार्थ मिळतात म्हणुन ग्राहकांची समजूत असल्याने नेहमी गर्दी असते. खाद्यपदार्थ बनविण्यासाठी लागणारे साहित्यची कधीही चौकशी केली नाही.
परंतु पाणीपुरी खाण्यासाठी गेलेल्या एका धाडसी महिलेने येथील खाद्यपदार्थचा दर्जा कशा प्रकारे हानिकारक आहेत हे सर्वांना दाखवून दिले.
ऐरोलीतील एक महिला पाणीपुरी खाण्याकरिता येथे गेली असता त्यांनी पाणीपुरी मध्ये वापरण्यात येणाऱ्या पाण्याबाबत विचारपूस केली असता, त्यांच्या असे निदर्शनास आले की, वेलकम स्वीट अँड स्नॅक्स कॉर्नर येथे पाणीपुरी बनविण्यासाठी बाथरूमचं पाणी वापरले जात आहे तर ज्यूससाठी वापरलेली काही फळे ही पुर्णतः सडलेली असल्याचे दिसून आले.
त्यांनी ही बाब उघड करताच जमलेल्या नागरिकांनी एकच गोंधळ घातला.शेवटी दुकान मालकाने आपली चूक मान्य करून जनतेची जाहीर माफी मागितली.
कोरोना काळात येथे कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टनसिंग पाळले जात नव्हते. कर्मचारी मास्क, सॅनिटायझरचा वापर करताना दिसत नव्हते. मार्जिनल स्पेस मध्ये अनधिकृत पणे धंदा सुरू होता. याबाबत अनेक तक्रारी पालिकेत नोंद आहेत परंतु तरीही कोणत्याच प्रकारची शुल्लक कारवाई सुद्धा यांच्या दुकानावर करण्यात आलेली नाही. असे येथील नागरिकांचे म्हणने आहे.
जर एखाद्या गरिबाने घराच्या बाहेर जरी दुकान थाटले तर पालिका ट्रक भरून साहित्य आणते आणि कठोर कारवाई करते मग या आलिशान दुकानावर का कारवाई होत नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
यावेळी मनसे व भाजपाचे अनेक राजकीय नेते उपस्थित होते. स्थानिक समाजसेवक शिवाजी खोपडे यांनी रबाळे पोलीस स्थानकात तक्रार मांडली असता, नवी मुबंई महानगर पालिका, फूड डिपार्टमेंट व पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्याचे सांगण्यात आले आहे.
तसेच यांच्या खाद्यपदार्थचा दर्जा यांवर सुद्धा पाहणी करणे गरजेचे आहे. अशा दुकानांवर पालिकेने आपली वक्रदृष्टी टाकावी. अन्यथानागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूच राहतील.