पुण्यातील हडपसारच्या कोरोनाची लस बनवणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट देवुन तेथील कोरोना प्रतिबंधक लशीच्या उत्पादन प्रक्रियेचा आढावा जाणुन घेतला

पुणे- पुण्याच्या हडपसर भागातील मांजरी येथील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ला भेेेट देवुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना प्रतिबंधक लशीच्या उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेतला.
संपूर्ण जगाला भेडसावणाऱ्या कोरोनाच्या महामारीने संपूर्ण जग चिंतेत असताना कोरोना लस निर्माण करण्यात सिरम इन्स्टीट्यूटने महत्वपूर्ण कामगिरी पार पाडत आहे. त्यामुळे या कामगिरीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

सिरम ही जगातील सर्वात मोठी लस निर्मिती करणारी कंपनी आसून ती ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाने विकसित केलेल्या करोना प्रतिबंधक लशीची निर्मिती सिरम इन्स्टीट्यूट करत आहे.

पुण्यातील हडपसारच्या अदर पूनावाला यांच्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये आतापर्यंत ४ कोटी डोसची निर्मिती झाली आहे. सिरम इन्स्टीट्यूटने ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकासोबत करार केला आहे.
भारतात ‘कोविशिल्ड’ असे ऑक्सफर्डने विकसित केलेल्या या लशीचे नाव आहे. ऑक्सफर्डने तयार केलेली ही लस ७० टक्के परिणामकारक आसल्याचे सिध्द झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दि.२८ रोजी करोना लशीची निर्मिती सुरु असलेल्या प्रकल्पांना भेटी दिल्या.
अहमदाबादच्या झायडस कॅडिला कंपनीच्या प्रकल्पाला त्यांनी भेट देवुन येथे स्वदेशी लस (झायकोव्ही-डी लशीची) निर्मिती सुरु आहे. त्याची त्यांनी माहिती जाणुन घेतली.
त्यानंतर पुण्याच्या हडपसर भागातील मांजरी येथील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये कोविशिल्ड प्रकल्पाचा आढावा जाणुन घेण्यासाठी आले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुणे विमानतळावर स्वागत करण्यात आले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शनिवारी रोजी वायुसेनेच्या विमानाने लोहगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जैस्वाल, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख ले.जनरल सी.पी. मोहंती, एअर कमोडोर एच.असूदानी यांनी स्वागत केले.

त्या नंतर ते हडपसारच्या दिशेने सौरक्षणाच्या ताफ्यासह रवाना झाले.
मांजरी परिसरातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट देवुन करोना प्रतिबंधक लशीच्या उत्पादन प्रक्रियेचा आढावा जाणुन घेतला.

अदर पुनावाला यांनी पंतप्रधान मोदी यांना लस संदर्भात विविध कामाची व लस देण्यांच्या तयारीची माहिती करून दिली.

यावेळी सिरमचे सीईओ अदर पूनावाला यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. यावेळी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपनीचे मुख्यकार्यकारी संचालक डॉ. सायरस पुनावाला,मुख्यकार्यकारी अधिकारी अदर पुनावाला कार्यकारी संचालक नताशा पुनावाला उपस्थीत होते.



Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने

Popular Items