कोंढवा येथील भाग्योदय नगर येथे मोफत राशन वाटप
|
|
कोंढवा दि,१२मे- पुण्यातील कोंढवा खुर्द येथील भाग्योदय नगर सर्व्ह नंबर ४३ ग्रीनपार्क येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर हॉकर्स सेल आणि राष्ट्रवादी काँगेस ओ बी सी सेल च्या संयुक्त विद्यमाने लॉकडाउनच्या संकटामुळे अडचणीत असलेल्या कुटुंबांना मोफत राशन वाटप करण्यात आले.
लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या गरीब कुटुंबांना मदतीचा ओघ सुरू आहेत.असे अनेक ठिकाणी अनेक स्वयंसंस्था राजकीय पक्ष सामाजिक कार्यकर्त्या कडून मदत कार्य सुरू आहेत.त्याचाच एक भाग म्हणून सामाजिक भान ठेवून वरील प्रमाणे मदत देऊ केली आहे.यावेळी राष्ट्रवादी पार्टी हॉकर्स सेलचे अध्यक्ष अल्ताफ शेख, जाकिर नदाफ, मुस्तकीम शेख, इर्शाद शेख उपस्तीत होते.