महाराष्ट्र नवक्रांती टीम-
पुणे दि.१४मे - संभाजीराजे अत्यंत देखणे, शूर, धुरंधर राजकारनी, धर्म रक्षक स्वाभिमानी हिंदवी स्वराज्य रक्षक होते.त्यांना परकीय सत्तेविरुद्ध आणि स्वकीयां विरुध्द लढावे लागले.म्हणुन जन्मापासून मृत्यू पर्यंतचा काळ हा त्यांच्या संघर्ष मय जीवनाचा धगधगता आलेख होता.त्यांच्या संघर्षमय जीवनाला त्यांच्या जयंती निमित्य विनम्र अभिवादन.
छत्रपती संभाजीराजे भोसले यांचा जन्म महाराष्ट्रातल्या पुणे जिल्यात पुरंदर किल्ल्यावर,१४ मे १६५७ रोजी छत्रपती शिवाजी महाराज आणि आईचे नाव सईबाईच्या पोटी झाला. संभाजी च्या पत्नीचे नाव येसूबाई असे होते. त्यांना शाहू आणि भवानीबाई असे दोन अपत्य होते.संभाजीच्या लहानपणीच त्याच्या आईचे निधन झालेे होते. बालवयातच आई वीणा पोरका होता. आईच्या निधनानंतर संभाजींचा सांभाळ त्यांची आजी जिजाबाईनी केला.आईची कमतरता त्यांना कधीच भासु दिली नाही. त्याची सावत्र आई, पुतळाबाई यांनी देखील त्यांच्यावर खूप प्रेम केले,खूप माया दिली.
वक्तिमत्व :-
संभाजीराजे अत्यंत देखणे,आणि शूर होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र अर्थात तो राजपुत्र असल्यामुळे असल्याने रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपनात मिळत गेलेले होते.जन्मापासून ते राजकारणातील बारकावे त्यांनी जवळून पाहिले होते. त्यामुळे ते अनेक संकटांना सामोरे गेले.जन्मापासून ते मृत्यू पर्यंतचा काळ हा त्यांच्या संघर्षमय जीवनाचा अलेखच म्हणता येईल. त्यांना जसा परकीयांच्या सत्तेचा त्रास होता तसा स्वकीयांचा सुद्धा त्रास होत होता. एकाच वेळी त्यांना दोघांशी संघर्ष करावा लागला. तरी ही ते डगमगले नाहीत. त्यावर मात करीत त्यांनी हिंदवी स्वराजांचा स्वाभिमानी इतिहस घडवला.
आदर्श पालक :-
संभाजीला वाढवण्यात शिवाजी महाराज पालक म्हणून कुठे ही कमी पडले नाहीत.आईचे छत्र लहानपणी हिरावले गेले परंतु शिवाजी महाराजांनी राज्याचा एक आदर्श, कुशल उत्तराधिकारी म्हणून संभाजी कडे पाहिले.जेव्हा-जेंव्हा मोहिमेवर जाण्याची वेळ मिळेल तेंव्हा त्यांना ते सोबत सुध्दा घेऊन जायचे.आग्रा भेटीच्या वेळी संभाजीराजे सोबत होते तेंव्हा संभाजी केवळ ९ वर्षाचे होते.
शिवाजी महाराज कैदेत सापडले तेंव्हा त्यातून चतुराईने निसटले. परंतु मोगली सैनीकांचा ससेमिरा मात्र वाढला संभाजी राजांना काही काळ सुरक्षित ठेवणे गरजेचे वाटू लागले होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी संभाजींना मधुरेला मोरोपंत पेशवाच्या मेहुण्याच्या घरी ठेवन्याचा निर्णय घेतला. मुघली सैनिकांचा संभाजी राजांच्या मागचा ससेमिरा थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचागादीचा वारस जपला आणि वाढवला.
राज्यव्याप्ती :-
हिंदवी स्वराज्याची सत्ता साम्राज्य पश्चिम महाराष्ट्र, कोकण, सह्याद्रीच्या डॊंगररांगांपासून ते नागपूरपर्यंत आणि उत्तर महाराष्ट्रच्या खानदेशापासून ते जदक्षिण भारतात तंजावर पर्यंत साम्राज्य पसरले होते. याची राजधानी रायगड होती.