भन्ते राहुल बोधी धम्म देशना देताना मुलांना साहित्य वाटप करताना
पुणे - कोंढवा साईनगर येथील सम्राट अशोक बुद्ध विहारात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने त्रिरत्न सोशल फाउंडेशनच्या वतीने एक विशेष कार्यक्रi0माचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात भन्ते राहुल बोधी यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षावासाचा औपचारिक प्रारंभ करण्यात आला.गुरु आषाढ पौर्णिमा पासून दर दिवस सायंकाळी 7 या वेळेत अशोक सम्राट बुद्ध विहारात बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे नियमित वाचन आणि विश्लेषण करण्यात येणार येत आहे.
सत्कार कार्यक्रम
या वर्षावास प्रारंभ कार्यक्रमात आपल्या धम्म देशनेत भन्ते राहुल बोधी यांनी पौर्णिमा आणि बुद्ध धर्मातील ऐतिहासिक घटनांचा परस्पर संबंध स्पष्ट केला. बुद्ध धर्मात अनेक महत्त्वपूर्ण घटना पौर्णिमेच्या दिवशी घडल्या असल्याने, पौर्णिमा हा दिवस बौद्ध परंपरेत अत्यंत पवित्र मानला जातो, असे त्यांनी सांगितले.
वर्षावासाचा इतिहास उलगडून दाखवताना त्यांनी बौद्ध भिक्षूंनी पावसाळ्यात एकाच स्थळी थांबून धम्माचे अनुशीलन करण्याचे महत्त्व पटवून दिले. त्याचबरोबर, जपान आणि थायलंडमधील अनुयायांच्या तुलनेत भारतातील बौद्ध अनुयायांनी धम्म आचरणाच्या बाबतीत अधिक जागरूक होण्याची गरज असल्याचे सांगून त्यांनी "प्रत्येक बौद्ध उपासक-उपासिकेने नियमित बुद्ध विहारात येऊन धम्माचे आचरण करावे," असा संदेश आपल्या उपदेशातून दिला.
कार्यक्रमास त्रिरत्न सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष पालखे, उपाध्यक्ष अप्पा तळेकर, सेक्रेटरी सागर कांबळे, भागवत पालखे, अनंत सरोदे, वसंत करमणकर, राम आखाडे,झेंडे सर, भारूड साहेब,,बापू शिंदे, श्रीसागर मॅडम,अमर जाधव, सुतार,बौद्ध उपासक-उपासिका, तसेच बालक व बालिकांची उत्स्फूर्त उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या शेवटी उपासक राम आखाडे व अनंत सरोदे यांनी सूत्रसंचालन व आभार व्यक्त केले