केंद्र सरकारने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयानंतर पी ए इनामदार यांनी बॅकेत गैरव्यवहार केल्याची तक्रारिवरुन सीबीआय चौकशीत कांही तथ्य असल्याच्या सी बी आय च्या अहवाला नुसारइनामदार यांना अटक होण्याची शक्यता


महाराष्ट्र नवक्रांती टीम
पुणे, दि. २४ नोव्हेंबर- नोटबंदीच्या घोषणेनंतर दि मुस्लिम को ऑप. बॅकेचे तत्कालीन अध्यक्ष पी.ए. इनामदार यांनी काही अधिका यांशी संगनमत करुन, एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटांची देवाणघेवाण केल्याची तक्रार सीबीआयला करण्यात आली होती.
या तक्रारीची दखल घेत केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने २०१८ मध्ये दि मुस्लिम को-ऑप. बॅकेच्या महाराष्ट्रातील १७ शाखांसह ३२ ठिकाणी छापेमारी करत कारवाई केली होती.
या छाप्यांमधील जमा केलेल्या कागदपत्रांची छाणणी करण्यात आली असून त्यानुसार
महत्वपूर्ण धागे मिळाल्याचे सीबीआयने कोर्टासमोर सांगितले आहे.
पी. ए. इनामदार यांना आरोपी करण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी सीबीआयने सहकार आयुक्तांना पत्रव्यवहार पुर्ण करून त्याची प्रक्रिया पुर्ण केली आहे.
त्यानुसार फौजदारी प्रक्रिया संहितेच्या १६४ कलमाप्रमाणे जबाब नोंदवण्याचे काम सुरु आहे.
१२ आठवड्यांच्या आत या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करणार असल्याचे सीबीआयने कोर्टात भूमिका मांडली.
त्यावर कोर्टाने त्यांचे म्हणणे मान्य करत त्याची नोंद घेतली.

सीबीआयने आपली स्पष्ट भूमिका कोर्टासमोर मांडावी अशी मागणी फिर्यादींनी केली होती.
तसेच हि केस ठराविक वेळेच्या बंधनात चालवण्याची देखील मागणी केली होती. त्यावर चालवण्याची देखील मागणी केली होती.
त्यावर फिर्यादिंच्या मतांची दखल कोर्टाने घेतली.

केंद्र सरकारने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयानंतर इनामदार यांनी मनी Sister बॅकेत गैरव्यवहार केल्याची तक्रार तहेरिक ए अवामी महाज चे सदस्य आसिफ खान यांनी केली होती.
तसेच बॅंकेचे संचालक एस.एम. इक्बाल यांनीही बॅकेच्या गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी केली होती.
त्यावरून सीबीआयने 2018 मध्ये संपुर्ण राज्यात बॅकेच्या शाखांवर छापेमारी करत महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली होती.
त्यामध्ये पुण्याच्या मुख्य शाखेसह बारामती आणि लोणावळ्याच्याही शाखांचा Baas होता.
तसेच सहकार आयुकतानी पी.ए. इनामदार यांना आरोपी करण्याची परवानगी दिली असल्याची माहिती मुस्लिम को ऑप. बॅकेचे संचालक एस.एम. इक्बाल यांनी दिली.
Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने