टेनिस बॉल स्पर्धेत कोंढवा पोलिस स्टेशन व समर्थ पोलिस स्टेशन संघामध्ये झालेल्या अंतिम सामन्यात कोंढवा पोलिस स्टेशनची बाजी.

कोंढवा येथे घेण्यात आलेल्या कोंढवा प्रीमियर लीग (भव्य फुल पीच टेनिस बाॅल स्पर्धा) खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण राष्ट्रवादी चे आमदार चेतन दादा तुपे व माजी महापौर प्रशांतदादा जगताप यांच्या हस्ते व डीसीपी नम्रता पाटील यांच्या उपस्थित कोंढवा येथे मोठ्या उत्साहात रविवारी सम्पन्न झाला

या स्पर्धेत पठाण सुपर किंग्स आणि पठाण पैंथर्स या संघामध्ये झालेल्या फायनल मध्ये पठाण पैंथर संघाने विजय मिळुन प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले.

तर राष्ट्रवादी चषकसाठी झालेल्या कोंढवा पोलिस स्टेशन व समर्थ पोलिस स्टेशन या संघामध्ये फायनल कोंढवा पोलिस स्टेशन संघाने बाजी मारली.

याचे पारितोषिक वितरण हडपसरचे राष्ट्रवादी चे आमदार चेतन दादा तुपे व माजी महापौर प्रशांतदादा जगताप यांच्या हस्ते व डीसीपी नम्रता पाटील या उपस्थित झाले.

येथे झालेल्या तीन दिवसीय स्पर्धेत ऐकुन १६ संघाने खेळात सहभाग घेतला.
Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने