पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने
भारतरत्न.माजी पंतप्रधान,स्व.राजीवजी गांधी यांच्या जयंती निमित्त शिवनेरी नगर कोंढवा खुर्द पुणे येथे गरीब महिलांना राशन किट वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन हडपसर विधानसभा ब्लाँक काँग्रेस सरचिटनीस मा.देवदास दत्तात्रेय लोणकर यांनी केले होते.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष,पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष मा.रमेशदादा बागवे व पुणे शहर काँग्रेस ओबीसी विभाग अध्यक्ष मा.साहिलजी केदारी यांच्या हस्ते किट वितरण करण्यात आले.
यावेळी माजीनगरसेवक राजेंद्र शिरसाट, अब्दुल बागवान, सादिक पानसरे,दत्ता डुरे, प्रदिप जगताप,जाकिर नदाफ, पत्रकार मल्लिनाथ गुरवे, हडपसर महिला काँग्रेस अध्यक्षा माया डुरे, पुणे शहर काँग्रेस महिला सचिव कांचन बालनायक, अनु.जाती.विभागाच्या रिबेका कांबळे, सेवा दलाच्या विना कदम, हडपसर विधानसभा अपंग विभाग अध्यक्षा मिनाक्षी शिंदे, ग्लाँडस डायस व परिसरातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.
यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सोहेल लांडगे यांनी केले.