राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त पुण्यातील कोंढवा येथे चित्र प्रदर्शन व व्याख्यानाने जयंती साजरी

पुणे/कोंढवा दि,११ जाने- राजमाता जिजाऊ शहाजीराजे भोसले यांच्या जयंती निमित्त त्यांच्या जीवनातील महत्वपूर्ण माहीती दर्शक चित्र प्रदर्शन व व्याख्यानाने जयंती साजरी करण्यात आली.

पुण्यातील हडपसर मतदारसंघात कोंढवा खुर्द येथील भैरवनाथ मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दि.११ व १२ जानेवारी दरम्यानच्या काळात नागरिकांसाठी चित्र प्रदर्शन व त्यासंदर्भातील महत्वपुर्ण माहिती दर्शक चित्र प्रदर्शन ठेवण्यात आले आहे.
यावेळी मराठा सेवा संघाचे पुणे शहर अध्यक्ष मा.श्री सचिनजी आडेकर यांच्या हस्ते जिजाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दिप प्रज्वलनाने उदघाटन करण्यात आले.
यावेळी कै.ज.ना.दुगड महाविद्यालयाच्या माजी मुख्यध्यापिका श्रीमती सुनिता ननावरे यांचे जिजाऊ यांचा विचार व त्यांचे कार्य या विषयावर सविस्तर विचार मांडले. तर कार्यक्रमाचे उद्धघटक, मराठा सेवा संघाचे पुणे शहर अध्यक्ष मा.श्री सचिनजी आडेकर यांनी त्यांच्या भाषणात शिव छत्रपती व जिजाऊ माता यांचा खरा इतिहास जगासमोर आणण्याची खरी गरज असल्याचे सांगितले.
यावेळी मा.श्री राहुल लोणकर, मा.श्री सागर लोणकर, मा.श्री तुकाराम लोणकर, मा.अँड.महादेव कुंजीर, मा.श्री शौलेश काटे, मा.श्री अमोल अरगडे, मा.श्री विमल नंबियार, समीर ईनामदार, प्रो.शोहेब ईनामदार, गजानन भोसले, व महिला कार्यकर्त्या सौ. माया डुरे, सौ.ज्योत्स्ना लोणकर, सौ. सुरेखा जुजगर, सौ.कांचन बालनायक, सौ. मिनाक्षी शिंदे, सौ. संगिता चव्हाण व ग्रामस्त उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन मा. श्री गणेश भोईटे यानी केले, व आभार प्रदर्शन संयोजन मा.श्री देवदास लोणकर यांनी केले.
राजमात जिजाऊ जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन कोंढवा खुर्द ग्रामस्त यांच्या वतीने करण्यात आले.
Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने