प्रत्येकाला समाजकारण,रराजकारण होण्याची महत्वकांक्षा असते. परंतु प्रत्येकाला संधी मिळते असे नाही. आधुनिक राजकारणांतील बदलते संदर्भ, बदलत्या संकल्पना, आणि बदलते नागरी जीवनमानानुसार विकासाच्या संकल्पना बदललेल्या आहेत. त्यामळे नव्याने नगरसेवक होण्यासाठी राजकारणातील बारकावे, विकासाच्या संकल्पना याची चांगली जाण असणे महत्वाचे आहे. त्यांच्यासाठी कोविड-१९ च्या नियमानुसार अधिन राहून इंक्रेडीबल सोशल संस्थेच्या वतीने मोफत मोफत कार्यशाळा घेण्यात येत आहे.
कार्यशाळेत सहभागी उमेदवारांना नगरसेवकांचे कामे, विविध शासकीय योजना बाबतची माहिती, प्रभातातील प्रश्न, निवडणुक फॉर्म भरण्याची प्रक्रिया, प्रभाग, वार्ड, बुथ, मतदारयादी, महानगरपालिका माहिती, क्षेत्रिय कार्यालय, पोलीस, न्यायलयीन बाबींची माहिती,भाषण कला, बोलतला आत्मविश्वास, प्रशासनाशी कागदोपत्री व्यवहार कसे करावे,याची सखोल माहिती देण्यात येनार आहे.
विविध क्षेत्रातील मान्यवर आभ्यासक,आधिकरी यांच्या माध्यमातून ही कार्यशाळा घेतली जाणार आहे. हा उपक्रम इनक्रेडिबल समाजसेवक गृप पुणे तर्फे आयोजित करण्यात येणार आहे.त्यासाठी असलम इसाक बागवान इनक्रेडिबल समाजसेवक गृप पुणे मो.०८८०५४८५७१९ वर आपली संपूर्ण माहिती पाठवावी असे आवाहन करण्यात आले आहे.