पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक सेलच्या वतीने राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री मा.ना.नवाब मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत कोंढवा येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.
आपल्या हडपसर मतदारसंघात मा.ना.नवाब मलिक साहेब यांचे स्वागत केले. त्यांनी यावेळी कार्यकत्यांशी संवाद साधला.
माझ्या मतदारसंघातील कोंढवा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विविध विकासकामे सुरू आहेत त्यांची माहिती यावेळी मा. मंत्रीमहोदयांना दिली. पुण्यातील अल्पसंख्यांक बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून कटिबद्ध आहोत. या बैठकीत अल्पसंख्यांक समाजाच्या विविध मागण्या, शासकीय ध्येय-धोरणे तसेच संघटना बांधणी यावर चर्चा झाली.
यावेळी पुणे शहराध्यक्ष मा. प्रशांत जगताप, नगरसेवक हाजी गफूर पठाण, नगरसेविका नंदाताई लोणकर, अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष समीर शेख, माजी नगरसेवक रईस सुंडके, हाजी फिरोज शेख, इकबाल शेख, अब्दुल हाफिज शेख, मेहबूब शेख आदि मान्यवर उपस्थित होते.