निकृष्ठ दर्जाच्या कामाच्या निषेधासाठी वानवडी क्षेत्रीय कार्यालयात गांधीगिरी !

पुणे : वानवडी क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत  कामाचा निकृष्ट दर्जा समोर येत असताना सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत अधिकाऱ्यांना गुलाब पुष्प देवून त्यांचा गांधीगीरी पद्धतीने निषेध करण्यात आला. 

सहा सप्टेंबर  रोजी इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप च्या वतीने निषेधाचा  गुलाबपुष्प देवून केलेला गांधीगीरी सत्कार 
घेण्यास अधिकारी, कर्मचाऱ्यांची पंचायत झाली. 

या आंदोलनाचे आयोजन इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष असलम इसाक बागवान यांनी केले. तर मार्गदर्शन इब्राहिम खान यांनी केले. 

यावेळी गांधीगिरीच्या मार्गाने लेखी निवेदन वानवडी क्षेत्रीय कार्यालयचे साहय्यक उप आयुक्त तारू  यांना देण्यात आले.


Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने

Featured Post

Popular Items