सामाजिक जाणीव, योग्य समुपदेशन व जनजागृतीतून गुन्हेगारी कमी होवू शकेल : पोलीस निरीक्षक अण्णासाहेब बाबर

पुणे/कोंढवा : (प्रतिनिधी) 

हडपसर भागातील आयडियल एज्युकेशन ट्रस्ट, सय्यद नगर यांच्या वतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त विविध सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी कळेपडल पोलीस स्टेशनच्या क्राईम बिट चे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब बाबर हे होते. यांनी सामाजिक जाणीव, जनजागृती व योग्य समुपदेशन द्वारे गुन्हेगारी कमी करण्यासाठी शाळा, शैक्षणिक संस्था आणि कामगार यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. असे सांगून गुन्हेगारीमुक्त समाज घडवण्यासाठी पोलीस सातत्याने कार्यरत असल्याचे सांगितले.


संस्थेने यावर्षी ही सामाजिक बांधिलकी जपत २५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक योजना अंतर्गत स्वीकारल्याचे  प्रास्ताविकात प्रा. शोएब इनामदार यांनी केले.

पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका प्राची आल्हाट यांच्या हस्ते कामगारांचा सत्कार करण्यात आला. याचबरोबर संस्थेच्या वतीने मोफत डोळे, कान, नाक व घसा तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी मोफत कूपनचे वाटपही करण्यात आले. या उपक्रमासाठी इनामदार्स एन्व्हिजन डोळ्यांचा दवाखाना आणि डॉ. अबोली इनामदार यांनी विशेष सहकार्य केले.

ज्येष्ठ लेखक प्रा. दिलीप गरुड यांनी लोककथांच्या माध्यमातून उपस्थित कामगारांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात शिक्षक इम्रान शेख व बाळू भंडारी यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या "जग बदल घालुनी घाव" या पोवाड्याचे प्रभावी सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली.या कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शफी इनामदार व कार्याध्यक्ष फहीम इनामदार यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीताने वातावरण देशभक्तीने भारावून गेले होते.

यावेळी शकीला इनामदार, रिफान इनामदार, अनिल ढावरे, शेखलाल चाचा, मसूद शेख, शकील इनामदार, इमाम शेख, मंगेश आल्हाट, दत्ता घुले, अब्दुल रहेमान शेख आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इमरान शेख यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुसाएब शेख यांनी मांडले.

Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने